Xiaomi चा सब-ब्रँड Poco मोठी तयारी करत आहे. कंपनी लवकरच जागतिक बाजारात आपला नवीन गेमिंग फ्लॅगशिप स्मार्टफोन Poco F4 GT स्मार्टफोन सादर करू शकते. हा फोन काही दिवसांपूर्वी चीनमध्ये आलेल्या Redmi K50 Gaming Edition चा रीब्रँड व्हर्जन असेल. या फोनची कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नसली तरी लिक्समधून आगामी Poco F4 GT स्मार्टफोनची बरीच माहिती टिपस्टर योगेश ब्रारनं दिली आहे.
Poco F4 GT ची किंमत
Poco F4 GT च्या जागतिक बाजारातील किंमतची माहिती मात्र मिळाली नाही. चीनमध्ये Redmi K50 Gaming Edition चा छोटा 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मॉडेल 3,299 युआन (सुमारे 38,900 रुपये) मध्ये सादर झाला आहे. जागतिक बाजारात ही किंमत थोडी वाढू शकते.
Poco F4 GT चे स्पेसिफिकेशन्स
या फोनमध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी+ अॅमोलेड AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश आणि 480Hz टच सॅंप्लिंग रेटला सपोर्ट करतात. हा फोन डिस्प्लेमेट A+ रेटिंगसह येतो आणि सोबत कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टसची सुरक्षा देण्यात आली आहे. पावर बॅकअपसाठी यातील 4700mAh ची बॅटरी वेगवान 120 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह मागे ट्रिपल सेटअप मिळतो. ज्यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सोनी कॅमेरा, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी यात 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. 12 जीबी पर्यंतचा वेगवान LPDDR5 रॅम आणि 256 जीबी पर्यंतची लेटेस्ट UFS 3.1 स्टोरेज मिळते. हा फोन क्वॉलकॉमच्या नव्या स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 चिपसेटसह बाजारात आला आहे. या फोनमध्ये ड्यूल VC कूलिंग देण्यात आली आहे.
हे देखील वाचा: