पोकोने भारतात काही दिवसांपूर्वी Poco M3 Pro 5G हा स्मार्टफोन लाँच केला होता. हा फोन आजपासून ईकॉमर्स साईट फ्लिपकार्टवर उपलब्ध होईल. या फोनची विक्री दुपारी 12 वाजल्यापासून सुरु केली जाईल. (Poco M3 Pro 5G Sale will begin on flipkart from 12pm)
Poco M3 Pro 5G ची किंमत 13,499 रुपयांपासून सुरु होते. या किंमतीत फोनचा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट विकत घेता येईल तर 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला मॉडेल 15,499 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. एसबीआयच्या क्रेडिट कार्डच्या मदतीने हा फोन विकत घेतल्यास 10% तर फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास 5% कॅशबॅक देण्यात येत आहे. हा फोन नो कॉस्ट ईएमआयवर देखील विकत घेता येईल.
POCO M3 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स
पोकोचा हा नवीन फोन पंच-होल डिस्प्लेसह लाँच झाला आहे. हा डिस्प्ले 20:9 अस्पेक्ट रेशियोला सपोर्ट करतो. तसेच या फुलएचडी+ एलसीडी डिस्प्लेचा आकार 6.5 इंच इतका आहे. हा फोन 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.
फोटोग्राफीसाठी POCO M3 Pro च्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 48 मेगापिक्सलच्या मुख्य कॅमेरासोबत दोन 2MP चे कॅमेरे (मॅक्रो आणि डेप्थ) देण्यात आले आहात. फोनच्या समोरच्या बाजूस 8MP चा सेल्फी शुटर आहे.
पोकोने या फोनसाठी मीडियाटेक डायमेंसिटी 700 चिपची निवड केली आहे, या प्रोसेसरला माली G57 GPU ची जोड देण्यात आली आहे. फोनमध्ये 64GB किंवा 128GB स्टोरेजसह 4GB किंवा 6GB RAM मिळेल. या पोको फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी बॅटरी 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. फोन अँड्रॉइड 11 वर आधारित MIUI 12 वर चालतो.