POCO उद्या म्हणजे 8 जूनला भारतात ‘एम’ सीरीजचा नवीन मोबाईल फोन POCO M3 Pro लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन यापूर्वी यूरोपियन मार्केटमध्ये लाँच आहे. त्यामुळे भारतीय बाजारात येण्यापूर्वीच फोनचे सर्व स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. परंतु, आता फोन लाँच होण्यापूर्वी POCO M3 Pro 5G फोनच्या रॅम व स्टोरेज व्हेरिएंट तसेच किंमतीचा देखील खुलासा झाला आहे. (POCO M3 Pro 5G Phone 6gb ram 128gb storage will be available at 17,999 Rs in India)
POCO M3 Pro 5G ची किंमत
POCO M3 Pro 5G फोन एकापेक्षा जास्त व्हेरिएंट्समध्ये लाँच केला जाईल. परंतु, एका लिक्सटरने ट्वीटच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे कि पोको एम3 प्रो 5जी फोन 6 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल आणि या व्हेरिएंटची किंमत भारतात 17,999 रुपये असेल. हि फोनच्या मोठ्या व्हेरिएंटची किंमत असू शकते. कंपनी भारतात या फोनचा छोटा व्हेरिएंट 15,000 रुपयांच्या आसपास लाँच करू शकते.
POCO M3 Pro 5G फोनचे स्पेसिफिकेशन्स
POCO M3 Pro काही दिवसांपूर्वी युरोपात लाँच झाल्यामुळे या फोनचे स्पेसिफिकेशन्स आधीपासून उपलब्ध आहेत. हा 6.5 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो, ज्याचा अस्पेक्ट रेशो 20:9 असून रिजोल्यूशन 2400 X 1080 पिक्सल आहे. 90 हर्टज रिफ्रेश रेटसह येणाऱ्या या फोनचा डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 च्या सुरक्षेसह येतो.
फोटोग्राफीसाठी POCO M3 Pro 5G फोनमध्ये मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर, फोनमध्ये दोन 2MP कॅमेरा (मॅक्रो आणि डेप्थ) देण्यात आले आहेत. सेल्फीसाठी POCO M3 Pro 5G मध्ये 8MP चा कॅमेरा मिळेल.
जागतिक बाजारात हा फोन दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. यात 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज आणि 6 जीबी रॅम + 128 जीबी व्हेरिएंट्सचा समावेश आहे. अँड्रॉइड 11 आणि मीडियाटेक डायमेंसिटी 700 चिपसेटसह येणाऱ्या या फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.