POCO आपल्या ‘एम’ सिरीजमध्ये अजून एक डिव्हाईस जोडण्याची तयारी करत आहे. आता कंपनी या सिरीजमध्ये POCO M3 Pro स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. हा डिवायस MediaTek Dimensity 700 चिपसेट, 90Hz डिस्प्ले आणि 5,000mAh बॅटरीसह काही दिवसांपूर्वी युरोपियन मार्केटमध्ये लाँच झाला होता. आता पोकोचा हा फोन भारतात येणार असल्याची माहिती पोको इंडियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. (Poco M3 Pro 5G will launch in India on 8 June)
पोको इंडियाने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलच्या माध्यमातून घोषणा केली आहे कि 8 जूनला POCO M3 Pro 5G फोन भारतात लॉन्च केला जात आहे. हा मोबाईल भारतात शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध होईल, असे देखील कंपनीने सांगितले आहे.
POCO M3 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स
POCO M3 Pro काही दिवसांपूर्वी युरोपात लाँच झाल्यामुळे या फोनचे स्पेसिफिकेशन्स आधीपासून उपलब्ध आहेत. हा 6.5 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो, ज्याचा अस्पेक्ट रेशो 20:9 असून रिजोल्यूशन 2400 X 1080 पिक्सल आहे. 90 हर्टज रिफ्रेश रेटसह येणाऱ्या या फोनचा डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 च्या सुरक्षेसह येतो.
फोटोग्राफीसाठी POCO M3 Pro 5G फोनमध्ये मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर, फोनमध्ये दोन 2MP कॅमेरा (मॅक्रो आणि डेप्थ) देण्यात आले आहेत. सेल्फीसाठी POCO M3 Pro 5G मध्ये 8MP चा कॅमेरा मिळेल.
जागतिक बाजारात हा फोन दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. यात 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज आणि 6 जीबी रॅम + 128 जीबी व्हेरिएंट्सचा समावेश आहे. अँड्रॉइड 11 आणि मीडियाटेक डायमेंसिटी 700 चिपसेटसह येणाऱ्या या फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.