शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
2
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
3
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
4
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
5
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
6
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
7
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
8
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
9
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
10
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
11
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
12
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
13
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक
14
...तर ५० उमेदवार उभे केले असते, समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक भाष्य
15
शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 
16
Maharashtra Election 2024: सरकार आल्यास मविआ कोणासाठी काय करणार? ठाकरेंनी सांगून टाकलं
17
Eknath Shinde : "....मी एकदा नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार"; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं
18
लोकसभा निवडणुकीत भुजबळांकडून राजाभाऊ वाजेंना मदत?; हेमंत गोडसेंनी शिवसैनिकांसमोर केला गंभीर आरोप!
19
सुशांतची आत्महत्या नाही तर हत्या! सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचा खळबळजनक दावा, म्हणते, डॉक्टरांनी बदलले पोस्टमोर्टम रिपोर्ट
20
“जयश्री पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार, यांनाच निवडून द्या”; विशाल पाटील यांचे आवाहन

किंमत पाहून हा नवा 5G Phone त्वरित कराल बुक; इतक्या स्वस्तात 5000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा

By सिद्धेश जाधव | Published: April 29, 2022 2:54 PM

नव्या POCO M4 5G स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी, 50MP कॅमेरा आणि 90Hz रिफ्रेश रेट मिळतो.

ठरल्याप्रमाणे पोकोनं आपला नवा 5G फोन भारतात सादर केला आहे. कंपनीनं या फोनची किंमत खूप कमी ठेवली आहे. तरीही नव्या POCO M4 5G स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी, 50MP कॅमेरा आणि 90Hz रिफ्रेश रेट मिळतो. हा नवीन पोको मोबाईल फक्त 12,999 रुपयांची किंमतीसह आला आहे, त्यामुळे पोको एम4 5जी भारतातील सर्वात स्वस्त 5जी फोन्स पैकी एक आहे.  

POCO M4 5G चे स्पेसिफिकेशन्स 

पोको एम4 5जी स्मार्टफोन 6.58 इंचाच्या फुलएचडी+ आयपीएस एलसीडी पॅनलसह बाजारात आला आहे. वॉटर ड्रॉप डिजाईनसह 90हर्ट्ज रिफ्रेश रेट, 600निट्स ब्राईटनेस आणि 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट मिळतो. फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅश, 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सलची पोर्टरेट लेन्स मिळते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा सेन्सर आहे. 

पोको एम4 5जी फोन अँड्रॉइड 12 आधारित मीयुआय 13 सह लाँच झाला आहे. कंपनीनं मीडियाटेक डिमेनसिटी 700 चिपसेटसह माली-जी57 एमसी2 जीपीयू दिला आहे. आयपी52 वॉटर रेजिस्टन्ससह साईड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देखील एम्बेडेड पावर बटन आहे, हा 5000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो जी 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते.  

POCO M4 5G ची किंमत 

POCO M4 5G स्मार्टफोनच्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेजची किंमत 12,999 रुपये आहे. तर 6 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत 14,999 रुपये ठेवण्यात आली आहे. येत्या 5 मेपासून फ्लिपकार्टवर हा डिवाइस Cool Blue, Power Black आणि POCO Yellow कलरमध्ये खरेदीसाठी उपलब्ध होईल. 

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड