POCO सध्या बाजारात सुरु असलेल्या 5G ट्रेंडपासून दूर जात काहीतरी लवकरच 4G Phone सादर करणार आहे. हा फोन गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये आलेल्या POCO M4 Pro 5G Phone चा 4G मॉडेल असेल. जो POCO M4 Pro 4G नावानं बाजारात उपलब्ध होईल. या स्मार्टफोनची माहिती सर्टिफिकेशन्स साईट एनबीटीसीवरून समोर आली आहे.
NBTC वर आगामी पोको फोन 2201117PG मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. इथे यातील LTE कनेक्टिव्हिटीची माहिती मिळाली आहे. तसेच लिक्स आणि रिपोर्ट्समधून या फोनच्या अन्य स्पेक्सची माहिती मिळाली आहे. त्यानुसार, फोनमध्ये 90हर्ट्ज रिफ्रेश रेट दिला जाऊ शकतो. या पोको फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा तिसरा सेन्सर असेल.
याआधी आलेल्या Poco M4 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स
Poco M4 Pro 5G मध्ये कंपनीने 6.6 इंचाचा डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी कंपनीने MediaTek Dimensity 810 चिपसेटचा वापर केला आहे. त्याचबरोबर 6GB पर्यंत RAM आणि 128GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. या फोनचे दोन व्हेरिएंट जागतिक बाजारात आले आहेत.
Poco M4 Pro 5G स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 119 डीग्री वाईड अँगल सेन्सर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमधेही 5000mAh ची बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
हे देखील वाचा:
झकरबर्गला जबरदस्त हादरा! फेसबुकला विकावे लागू शकते व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम
7700mAh च्या राक्षसी बॅटरीसह Motorola नं लाँच केला टॅबलेट; जाणून घ्या Moto Tab G70 ची किंमत