पोको आपल्या नव्या 5G फोनवर काम करत असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. कंपनी आपल्या ‘एम सीरीज’ अंतर्गत POCO M4 Pro नावाचा नवीन स्मार्टफोन सादर करणार आहे. आता या 5G Phone च्या भारतीय लाँचची तारीख टेक वेबसाईट 91मोबाईल्सने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. हा लवकरच भारतात लाँच केला जाणार असल्याचा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
भारतीय लाँच
91मोबाईल्सने दिलेल्या वृतानुसार POCO M4 Pro 5G भारतासह जागतिक बाजारात देखील लाँच केला जाईल. रिपोर्टमधून अचूक तारीख समोर आली नाही, परंतु हा फोन ऑक्टोबरच्या अखेरच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात देशात पदार्पण करेल.
POCO M4 Pro 5G चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
लीक्स आणि रिपोर्ट्सनुसार POCO M4 Pro स्मार्टफोन मीडियाटेक डिमेनसिटी चिपसेटसह सादर केला जाईल. हा फोन अँड्रॉइड 11 किंवा अँड्रॉइड 12 सह मीयुआय 12.5 वर चालेल. POCO M4 Pro 5G फोन बाजारात 4GB रॅम आणि 6GB रॅम व्हेरिएंट आणि 128GB स्टोरेजसह सादर केला जाईल. त्याचबरोबर मायक्रोएसडी कार्ड सपोर्ट मिळेल.
फोटोग्राफीसाठी POCO M4 Pro 5G मध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा मिळू शकतो. इतर कोणत्याही सेन्सरची माहिती समजली नाही. पॉवर बॅकअपसाठी पोको एम4 प्रो मध्ये 5,000एमएएच बॅटरी मिळू शकते. पोको एम सीरिजमध्ये मिडबजेट स्मार्टफोन सादर करते, त्यामुळे हा 5जी फोन याच प्राईस सेगमेंटमध्ये सादर केला जाऊ शकतो.