पोकोने गेल्या आठवड्यात आपला लो बजेट स्मार्टफोन POCO C31 लाँच केला आहे. हा फोन बजेट सेगमेंटमध्ये सादर झालेला 4G फोन आहे. कंपनी लवकरच आपला आगामी 5G फोन कमी किंमतीत सादर करू शकते. आता आलेल्या ताज्या लिक्सनुसार कंपनी POCO M4 Pro 5G या नवीन स्मार्टफोनवर काम करत आहे जो लवकरच बाजारात दाखल होऊ शकतो.
POCO M4 Pro 5G फोनची माहिती टिपस्टर अभिषेक यादवने दिली आहे. लिक्सटरनुसार हा फोन EEC, 3C, IMEI आणि TENAA सारख्या सर्टिफिकेशन साईटवर लिस्ट झाला आहे. या लिस्टिंगमधून पोको एम4 प्रो ट्रेडमार्क आणि 21091116AG या मॉडेल नंबरची माहिती मिळाली आहे. हा फोन सर्वप्रथम भारतात सादर केला जाईल, अशी चर्चा आहे. परंतु कंपनीने या फोनची कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.
नुकत्याच लाँच झालेल्या POCO C31 चे स्पेसिफिकेशन्स
पोको सी31 मध्ये 20:9 अस्पेक्ट रेशियो, 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक 6.53 इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले आहे. पाण्यापासून वाचण्यासाठी या फोनवर पी2आई नॅनोकोटिंग देण्यात आली आहे. हा अँड्रॉइड 10 ओएसवर लाँच केला गेला आहे जो मीडियाटेकच्या हीलियो जी35 चिपसेटवर चालतो. ग्राफिक्ससाठी यात पॉवरवीआर जीई8320 जीपीयू देण्यात आला आहे. डिवाइसमध्ये 4GB पर्यंतचा RAM आणि 64GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळते.
फोटोग्राफीसाठी पोको सी31 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलची पोर्टरेट लेन्स मिळते. हा फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पॉवर बॅकअपसाठी पोको सी31 मध्ये 5,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.