बजेट 5G Phone सेगमेंटमध्ये Poco देखील आपली दावेदारी मजबूत करणार आहे. कंपनी जागतिक बाजारात Poco M4 Pro 5G स्मार्टफोन 9 नोव्हेंबरला लाँच करणार आहे. हा फोन भारतात येण्यासाठी डिसेंबर उजाडू शकतो. आता जागतिक लाँचच्या आधी Poco M4 Pro 5G फोनचे काही फोटोज ऑनलाइन लीक झाले आहेत. या फोटोजमधून या फोनच्या डिजाइनची माहिती मिळाली आहे.
Poco M4 Pro 5G ची डिजाइन
Poco M4 Pro 5G चे फोटोज The Pixel ने लीक केले आहेत. या फोटोजनुसार हा फोन काही दिवसांपूर्वी चीनमध्ये आलेल्या Redmi Note 10 5G चा रीब्रँड व्हर्जन वाटत आहे. या फोनमध्ये पंच होल डिस्प्ले दिला जाईल. रियर पॅनलवर मोठा कॅमेरा मॉड्यूल दिसत आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह दोन कॅमेरा सेन्सर आहेत. या सेटअपच्या शेजारी पोकोची ब्रँडिंग दिसत आहे.
POCO M4 Pro 5G चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
POCO M4 Pro 5G स्मार्टफोन Redmi Note 11 5G रिब्रँड असल्यास या फोन्सचे स्पेसिफिकेशन्स देखील सारखे असतील. त्यामुळे आगामी पोको फोन 6.6-इंचाच्या फुल एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्लेसह बाजारात येईल. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेशला सपोर्ट करेल. या फोनला 6nm प्रोसेसवर वाढती Dimensity 810 चिपसेटची ताकद देण्यात येईल. त्याचा 8GB RAM आणि 256GB पर्यंतची स्टोरेज मिळू शकते.
POCO M4 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. तसेच फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असेल. ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा सेन्सर मिळेल. या पोको फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात येईल.