POCO M4 Pro 5G स्मार्टफोन आज भारतात लाँच झाला आहे. हा फोन गेल्यावर्षी आलेल्या POCO M3 Pro चा अपग्रेडेड व्हर्जन आहे. जो 50MP कॅमेरा, 33W फास्ट चार्जिंग आणि 5000mAh च्या बॅटरीसह भारतात आला आहे. या स्मार्टफोनचे 3 व्हेरिएंट भारतात आले असून याची किंमत 14,999 रुपयांपासून सुरु होते. चला जाणून घेऊया Poco M4 Pro 5G ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स.
POCO M4 Pro 5G ची किंमत
POCO M4 Pro 5G स्मार्टफोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये ठेवण्यात आली आहे, ज्यात 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज मिळते. फोनच्या 6GB रॅम 128GB व्हेरिएंटसाठी 16,999 रुपये आणि 8GB रॅम आणि 128GB मॉडेलसाठी 18,999 रुपये मोजावे लागतील. हा फोन Power Black, Cool Blue आणि POCO Yellow कलरमध्ये विकत घेता येईल. हा फोन Flipkart वरून 22 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजल्यापासून विकत घेता येईल.
POCO M4 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स
POCO M4 Pro 5G स्मार्टफोनला मीडियाटेक डायमेन्सिटी 810 5G चिपसेटची ताकद देण्यात आली आहे. सोबत ग्राफिक्ससाठी माली-जी57 एमसी2 जीपीयू मिळतो. हा फोन 8GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येईल. यात पावर बॅकअपसाठी 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 33W फास्ट चार्जिंग स्पीडनं चार्ज करता येईल.
POCO M4 Pro 5G मध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.6-इंचाचा FHD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित मीयुआय 12.5 वर चालतो. यात बेसिक कनेक्टिव्हिटी ऑप्शन्ससह साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. फोटोग्राफीसाठी POCO M4 Pro 5G मध्ये ड्युअल रियर कॅमेरा मिळेल. ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 8MP चा अल्ट्रा-वाईड लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी डिवाइसमध्ये 16MP चा फ्रंट-फेसिंग कॅमेरा मिळतो.
हे देखील वाचा: