Poco भारतात नवीन स्मार्टफोन सादर करणार असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी समोर आली होती. आता या बातमीला कंपनीने दुजोरा दिला आहे. पोको इंडियाने एक टीजर ट्विटरवर शेयर केला आहे. या टीजरनुसार कंपनी आपल्या C-series चा पुढील स्मार्टफोन भारतात सादर करू शकते. हा फोन 30 सप्टेंबरला भारतात सादर केला जाईल.
कंपनी आपल्या ‘सी’ सीरिज अंतर्गत एंट्री लेव्हल स्मार्टफोन सादर करत असते. या सीरिजमधील स्मार्टफोनची किंमत 10,000 रुपयांच्या आसपास असते. कंपनीने टीज केलेला आगामी स्मार्टफोन Poco C3 ची जागा घेईल आणि Poco C4 नावाने बाजारात येईल. हा फोन फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध होईल.
गेल्यावर्षी लाँच झालेल्या POCO C3 चे स्पेसिफिकेशन्स
पोको सी3 स्मार्टफोन 20:9 आस्पेक्ट रेशियो आणि 1600 × 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.53 इंचाच्या एचडी+ सिनेमॅटिक डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड 10 ओएससह मीयूआई 12 वर चालतो. यात मीडियाटेकचा हीलियो जी35 चिपसेट देण्यात आला आहे. देशात हा फोन 4 जीबी पर्यंत रॅम आणि 64 जीबी पर्यंतच्या स्टोरेजसह उपल्बध झाला आहे.
फोटोग्राफीसाठी POCO C3 मधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 13 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर मिळतो. फोनच्या 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. हा डुअल सिम फोन 4जी वोएलटीई बेसिक कनेक्टिविटी फीचर्सला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 5,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.