गेल्या आठवड्यात POCO ने भारतात आपला नवीन 5G फोन गेमिंग स्मार्टफोन Poco F3 GT लाँच केला आहे. हा फोन 26,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता. या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह अॅमोलेड डिस्प्ले, 64MP कॅमेरा आणि मीडियाटेक Dimensity 1200 प्रोसेससह 5,065mAh ची बॅटरी मिळते. भारतात पोको एफ3 जीटी भारतात लाँच केल्यानंतर कंपनी आता जागतिक बाजारात नवीन फोन POCO X3 GT घेऊन येण्याची तयारी करत आहे. हा फोन 28 जुलैला मलेशियामध्ये लाँच होणार आहे, परंतु लाँचपूर्वीच या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स इंटरनेटवर लीक झाले आहेत.
POCO X3 GT च्या लाँचआधीच कंपनीने या फोनच्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे. पोको एक्स3 जीटी मध्ये पोको एफ3 जीटी प्रमाणे 5,000एमएएचची बॅटरी मिळेल, ही बॅटरी 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीद्वारे चार्ज करता येईल. प्रोसेसिंगसाठी पोको एक्स3 जीटी मध्ये Mediatek Dimensity 1100 चिपसेट मिळेल. त्याचबरोबर हा स्मार्टफोन 64MP ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.
POCO X3 GT चे संभावित स्पेसिफिकेशन्स
POCO X3 GT मध्ये 6.6 इंचाचा फुल एचडी+ एलसीडी डिस्प्ले मिळू शकतो. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. या पोको स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 1100 SoC आणि ARM G77 MC9 GPU दिला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन Android 11 आधारित MIUI 12.5 वर चालतो. हा फोन 8GB पर्यंतच्या रॅम आणि 256GB पर्यंतच्या स्टोरेजला करू शकतो.
POCO X3 GT मध्ये एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. यात 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स असू शकते. हा स्मार्टफोन 16 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करू शकतो. पावर बॅकअपसाठी POCO X3 GT स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी 67W फास्ट चार्जिंगसह दिली जाऊ शकते.