Poco F4 5G स्मार्टफोन भारतासह जागतिक बाजारात सादर करण्यात आला आहे. त्याचबरोबर जागतिक बाजारात Poco X4 GT हा नवीन मिड-रेंज गेमिंग फोन सादर करण्यात आला आहे. फोनमध्ये 8GB RAM, 67W फास्ट चार्जिंग, 64MP कॅमेरा आणि 5080mAh असे दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. लवकरच हा फोन Redmi K50i या नावानं भारतात लाँच होणार असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती.
Poco X4 GT चे स्पेसिफिकेशन
Poco X4 GT स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा फुल एचडी+ एलसीडी डिस्प्ले आहे, जो 144 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 20.5:9 अस्पेक्ट रेश्योला सपोर्ट करोत. हा डिवाइस डॉल्बी व्हिजनला देखील सपोर्ट करतो. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो, ज्यात एलईडी फ्लॅशसह 64MP मुख्य कॅमेरा, 8MP ची वाईड-अँगल लेन्स आणि 2MP ची मॅक्रो लेन्स आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16MP चा सेन्सर मिळतो.
Poco X4 GT स्मार्टफोन मीडियाटेक डायमेन्सिटी 8100 चिपसेटसह बाजारात आला आहे. सोबत 8GB रॅम आणि 256GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळते. फोन MIUI 13 बेस्ड अँड्रॉइड 12 ओएसवर चालतो. हा फोन IP53 रेटिंगसह येतो त्यामुळे धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित राहू शकतो. फोनचं तापमान कमी ठेवण्यासाठी व्हीसी लिक्विड कुलिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. यात 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 5080mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
Poco X4 GT ची किंमत
Poco X4 GT चचे दोन मॉडेल युरोपियन बाजारात सादर करण्यात आले आहेत. या स्मार्टफोनच्या 8GB रॅम आणि 128GB व्हेरिएंटसाठी 379 युरो (जवळपास 31,200 रुपये) मोजावे लागतील. तर 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेला मॉडेल 429 युरो (जवळपास 35,300 रुपये) मध्ये विकत घेता येईल. हा फोन ब्लू, ब्लॅक आणि सिल्वर कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे.