Poco X4 Pro 5G स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी भारतात सादर करण्यात आला आहे. हा फोन 11GB RAM, 5000mAh बॅटरी, 64MP कॅमेरा, 67W फास्ट चार्जिंग आणि 120Hz रिफ्रेश रेटसह भारतीयांच्या सेवेत दाखल झाला आहे. आज म्हणजे 5 एप्रिल 2022 ला या डिवाइसचा पहिला सेल आहे. पहिल्याच सेलमध्ये हा फोन दमदार डिस्काउंटसह विकत घेता येईल. चला जाणून घेऊया ऑफर.
Poco X4 Pro 5G ची किंमत
Poco X4 Pro 5G स्मार्टफोन आज दुपारी 12 वाजल्यापासून ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल. या फोनवर HDFC बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्ड धारकांना 1000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. तसेच जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून तुम्ही 6,549 रुपयांची बचत करू शकता. अशाप्रकारे तुम्हाला 7,549 रुपयांची सूट मिळू शकते.
Poco X4 Pro 5G चे तीन व्हेरिएंट भारतात आले आहेत. 18,999 रुपयांमध्ये या फोनचा 6GB RAM आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट मिळेल. 6GB RAM आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 19,999 रुपये आहे. 8GB RAM आणि 128GB स्टोरेज मॉडेलसाठी 21,999 रुपये मोजावे लागतील. हा फोन लेजर ब्लू, पोको येलो आणि लेजर ब्लॅक रंगात उपलब्ध होईल.
Poco X4 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स
फोनमध्ये कंपनीनं 6.67 इंचाच्या फुल एचडी+ सुपर अॅमोलेड डिस्प्लेचा वापर केला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 च्या सुरक्षेसह बाजारात आला आहे. या मोबाईलमध्ये अँड्रॉइड 11 आधारित MIUI 13 देण्यात आला आहे. प्रोसेसरसाठी यात स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट देण्यात आला आहे. पोकोच्या या नव्या स्मार्टफोनमध्ये 8 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळते. टर्बो रॅम फिचरच्या मदतीनं 11GB पर्यंत रॅम वाढवता येईल.
फोटोग्राफीसाठी Poco X4 Pro 5G मध्ये एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. या पोको फोनमधील 5000mAh ची बॅटरी 67 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. जी फक्त 15 मिनिटांत फोन 50 टक्के चार्ज करू शकते.