अनिल भापकर
मागील वर्षी म्हणजेच सप्टेंबर २०१८ मध्ये गुगलने अचानक जाहीर केले कि गुगलची इनबॉक्स हि ई-मेल सेवा मार्च २०१९ मध्ये बंद करण्यात येईल .गुगलच्या या निर्णयाने खरे तर टेक्नोसॅव्ही जगतामध्ये मोठी खळबळ उडाली होती. ३१ मार्च २०१९ पर्यंतच इनबॉक्सची सेवा बंद होणार होती मात्र गुगलने आणखी दोन दिवसाची मुदतवाढ देत आता ०२ एप्रिल २०१९ रोजी इनबॉक्सची सेवा बंद झाली आहे. स्पार्क हे ई-मेल सेवा पुरवणारे ऍप पूर्वी फक्त आयओएस साठी सेवा देत होते आता मात्र स्पार्क ची ई-मेल सेवा अँड्रॉइड साठी सुद्धा सेवा देणार आहे .
स्पार्क मध्ये काय फीचर्स आहेत ?
आयओएस मध्ये ई-मेल ची सेवा पुरविणाऱ्या ऍप मध्ये स्पार्क ची सेवा एक चांगली सेवा म्हणून ओळखली जाते.त्यामुळे आता हेच स्पार्क ऍप अँड्रॉइड स्मार्टफोन धारकांना सुद्धा यापुढे सेवा देणार आहे. Spark – Email App by Readdle हे ऍप आता गुगल प्लेवर डाउनलोड साठी अँड्रॉइड युझर्सला उपलब्ध आहे. यासाठी तुमच्या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड ६ किंवा त्यापेक्षा लेटेस्ट अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिम असायला हवी.
Spark – Email App by Readdle मध्ये महत्वाचे ई-मेल पिन करू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला जर एखादा ई-मेल नंतर पाठवायचा असेल तर तुम्ही आता तो ई-मेल टाईप करून ठेवा आणि जेव्हा ई-मेल पाठवायचा तेव्हा शेड्युल करा . रिमाइंडर , स्मार्ट सर्च ,फॉलो अप्स ,स्नूज ,पिन असे फीचर्स यामध्ये आहे. यासोबतच अजूनही अनेक चांगली फीचर्स यामध्ये उपलब्ध आहेत. फ्री आणि पेड अशा दोन प्रकारात Spark – Email App by Readdle उपलब्ध आहे . जवळपास ६१ एमबी साईज या Spark – Email App by Readdle ऍप ची आहे.