वॉशिंग मशीन, फ्रिज, एसी अशा वस्तू महागड्या असतात. काही कुटुंब छोटी असतात किंवा काही लोक घर बदलत असतात अशा लोकांसाठी या मोठ्या आणि महागड्या वस्तू घेणं योग्य वाटत नाही. अशा लोकांसाठी बाजारात असे अनेक पोर्टेबल पर्याय उपलब्ध आहेत. यातील Portable Washing Machine ची माहिती घेणार आहोत. जी तुमचे कपडे काही मिनिटांत धुवू शकते.
कुठे मिळेल Portable Washing Machine?
लोकप्रिय आणि प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon आणि Flipkart वरून तुम्ही पोर्टेबल वॉशिंग मशीन विकत घेऊ शकता. इथे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. परंतु आज आम्ही तुम्हाला फ्लिपकार्टवर उपलब्ध असलेल्या Inllex Front Load Portable Washing Machine ची माहिती देणार आहोत.
अशी आहे छोटीसी वॉशिंग मशीन
Inllex Front Load Portable Mini Folding Clothes Portable Washing Machine एक फोल्डेबल मशीन आहे. म्हणजे काम झाल्यावर तुम्ही ही फोल्ड अर्थात घडी करू ठेऊ शकता. हिचा आकार एखाद्या बादली सारखा आहे. हिची उंची जरी 24cm इतकी असली तरी फोल्ड केल्यास फक्त 5.5cm होते. ही मशीन 32cm रुंद आहे.
या पोर्टेबल वॉशिंग मशीनला पावर देण्यासाठी यूएसबी पोर्ट देण्यात आला आहे. हिच्या मदतीनं तुम्ही सहा ते आठ कपडे एकावेळी धुवू शकता. त्यामुळे हॉस्टेल राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा छोट्या कुटुंबासाठी ही योग्य ठरू शकते.
किंमत किती
या पोर्टेबल वॉशिंग मशीनची मूळ किंमत 9,799 रुपये आहे. परंतु फ्लिपकार्टवरून तुम्ही ही 4,900 रुपयांमध्ये विकत घेऊ शतक. फ्लिपकार्टवर ईएमआय द्वारे खरेदीचा ऑप्शन देखील देण्यात आला आहे. त्याचा वापर करून तुम्ही फक्त 170 रुपयांच्या हप्त्यावर ही मशीन विकत घेऊ शकता.