मुंबई : ग्राहकांना आपल्या आवडीच्या वाहिन्यांची निवड करता यावी यासाठी भारतीय दूरसंचार नियामक आयोगाने (ट्राय) टीव्ही चॅनेल सिलेक्टर अॅप तयार केले असून या माध्यमातून ग्राहकांना केबल, डीटीएच प्लॅनसाठी वाहिन्या निवडण्याची संधी उपलब्ध झाली आहे.आतापर्यंत वाहिन्यांची निवड करण्याचा पर्याय केबल आॅपरेटरच्या माध्यमातून देण्यात आला होता. त्यामुळे अनेकदा ग्राहकांना त्यांच्या आवडीऐवजी केबल आॅपरेटरच्या आवडीप्रमाणे वाहिन्या पाहाव्या लागत असल्याने ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण होते. मात्र आता या अॅपच्या माध्यमातून ग्राहक आपल्या प्लॅनमधून नावडत्या वाहिन्या हटवू शकतात व आवडीच्या वाहिन्यांची निवड करू शकतात.या अॅपला डीटीएच व केबल ऑपरेटरशी जोडण्यात आले असून सध्या ते गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.अशी करता येईल निवडग्राहकांना वाहिन्यांची निवड करताना वन टाईम पासवर्ड (ओटीपी) त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर पाठवला जाईल व त्यानंतर त्यांना निवड करता येईल. ज्या ग्राहकांचा मोबाइल क्रमांक नोंदणी केलेला नसेल त्यांना त्यांच्या टीव्ही स्क्रीनवर ओटीपी दिसेल.
ट्राय अॅपमधून आवडीच्या वाहिन्यांची निवड शक्य; 'अशी' करता येईल निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 2:45 AM