जगविख्यात कंपनी अॅप्पलचा फोटोग्राफीची स्पर्धा खूप मोठी असते. जगभरातून लाखो लोक त्यामध्ये भाग घेतात. यातून काही निवडक फोटो निवडले जातात आणि विजेते घोषित केले जातात. यंदा अॅप्पलने Shot on iPhone मायक्रो फोटोग्राफी चॅलेंज दिले होते. यामध्ये भारतीय तरुणाचा म्हणजेच आपल्या कोल्हापूरच्या तरुणाचा फोटो निवडण्यात आला आहे.
कोल्हापूरमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या प्रज्वल चौगुलेला अॅप्पलने बक्षीस दिले आहे. पहिल्या दहा फोटोंमध्ये त्याने काढलेल्या फोटोला नववा क्रमांक मिळाला आहे. अॅप्पलने शॉट ऑन आयफोन मायक्रो फोटोग्राफी चॅलेंजमध्ये २२ जानेवारी २०२२ पासून एन्ट्री घेण्यास सुरुवात केली होती. यामध्ये प्रज्वलने एक फोटो पाठविला होता. महत्वाचे म्हणजे या फोटोतील दृष्य आपल्या सर्वांनाच हिवाळ्यात दिसते. परंतू ते प्रज्वलने त्याच्या आयफोनमध्ये टिपले आणि जिंकला.
प्रज्वलने काढलेला फोटो अॅप्पलच्या अधिकृत वेबसाईटवर फिचर केला जाणार आहे. त्याच्यासोबत चीन, हंगेरी, इटली, स्पेन, थायलंड आणि अमेरिकेतील आयफोन युजर्सचे फोटो आहेत. याशिवाय अॅप्पलच्या इन्स्टाग्राम हँडलवर आणि निवडक शहरांच्या बिलबोर्डवर झळकवणार आहे. या स्पर्धेत ज्या देशातील लोक जिंकले आहेत त्या देशातही हे फोटो फिचर केले जाणार आहेत. या फोटोग्राफीमध्ये iPhone 13 Pro Max च्या मायक्रो कॅमेऱ्याला हायलाईट करायचे होते. या स्पर्धेत भाग घेण्याऱ्या आयफोन युजर्सना iPhone 13 Pro किंवा iPhone 13 Pro Max च्या मायक्रो लेन्सने फोटो काढायचे होते.
Prajwal Chougule ने कोळ्याचे जाळे आणि त्यावर हिवाळ्यात लगडलेले दवबिंदू असा सुरेख फोटो क्लिक केला. हा फोटो मोती एका धाग्यात अडकविल्यासारखे भासत होते. यावर प्रज्वलने त्याला निसर्गाची फोटो ग्राफी करण्यास आवडते. मॉर्निंग वॉकला जात असताना कोळ्याचे जाळे दिसले त्याचा फोटो काढला, असे त्याने सांगितले.