नवी दिल्ली, दि. 13 - मोबाइल फोनच्या जगातील बादशाह अशी बिरूदावली मिरवणा-या अॅपलनं आयफोनच्या दशकपूर्तीनिमित्त मंगळवारी आयफोन-8, आयफोन-8 प्लस आणि आयफोन एक्स हे तीन बहुप्रतिक्षित फोन लाँच केले. त्यानंतर अपेक्षेनुसार आयफोन 7 आणि आयफोन 6 च्या किंमतीत घट झाली आहे. आयफोन 7 च्या 32 जीबी च्या किंमतीतमध्ये तब्बल सात हजार रुपयांची घट झाली आहे. 56 हजार रुपयांना मिळणार आयफोन सात आता 49 हजार रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. तर आयफोन 7 प्लस (32 जीबी) च्या दरामध्ये आठ हजार रुपयांची कपात झाली आहे. 67 हजार रुपयांना मिळणारा आयफोन 7 प्लस आता 59 हजार रुपयांना बाजारात उपलब्ध असणार आहे.
आयफोन 7 च्या 128 जीबी च्या किंमतीतमध्ये मोठी कपात झाली आहे. 65 हजार 200 रुपयांना मिळणारा हा फोन आता 58 हजार रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तर यापूर्वी 76 हजार रुपयांना मिळणारा आयफोन 7 प्लस (128 जीबी) फोन आता 68 हजरांना मिळणार आहे.आयफोन 7 सोबतच आयफोन सहाच्या किंमतीही घसरल्या आहेत. आयफोन 6 प्लसच्या (32 जीबी) किंमतीमध्ये सात हजार रुपयांची घट झाली आहे. 56 हजार रुपयांना मिळणारा आयफोन सहा प्लस आता 49 हजारांमध्ये मिळणार आहे. तर आयफोन 6 प्लस (128जीबी)चा फोन 58 हजारांमध्ये खरेदी करता येणार आहे. पूर्वी हा फोन 65 हजार रुपयाला होता. आयफोन 6Sच्या किंमतीही घसरल्या आहेत. 46 हजार 900 रुपयांना मिळणार 6S (32जीबी) आता 40 हजार रुपयांना मिळणार आहे. तर 55 हजार 900 रुपयांचा 6S (128जीबी) 49 हजारामध्ये उपलब्ध आहे.
काल मंगळवारी अॅपलनं आयफोनच्या दशकपूर्तीनिमत्त बाजारात तीन फोन आणले आहेत. यामध्ये आफोन 8, आयफोन 8 प्लस आणि आयफोन 8 एक्स यांचा समावेश आहे. आयफोन 8 एक्सची किंमत 999 डॉलर पासून सुरुवात होत आहे. भारतात या फोनची किंमत एक लाख रुपयांपर्यंत असू शकते. तर आयफोन 8ची किंमत 699 डॉलर (44760 रुपये) तर आयफोन 8 प्लसची किंमत 799 डॉलर (51163)पासून सुरु होईल.