रोजच आपण अँड्रॉईड फोन वापरतो.आणि त्यावेळेस आपल्याला खूप समस्या येतात.तर जाणून घेऊया यावरचे उपाय.
१- फोन क्रॅश होण्यापासून वाचवायला फोनमधील बॅटरी काढा,नंतर काही वेळानी बॅटरी रीइन्सर्ट करून फोन सुरु करा.
२- तुमच्या फोनमधली बॅटरी नॉन-रिमूव्हेबल असेल तर पॉवर बटन १५ सेकंदासाठी प्रेस करा ३- यानंतर सुद्धा अँड्रॉईड क्रॅश होत असेल तर फोन चार्जिंगला लावा आणि पॉवर बटन १५ सेकंदासाठी प्रेस करा.
४- गूगल प्ले स्टोअर मध्ये कॅशे मेमरी जास्त असते त्यामुळे ती वेळोवेळी साफ करावी लागते. असे न केल्यास गूगल प्ले स्टोअर स्लो होतो.
त्यासाठी settings > apps >all >google play services >clear cache जाऊन मेमरी क्लिअर करावी.आणि नंतर फोन रिस्टार्ट करावा.
५- खूप वेळा अॅप डाऊनलोड न होणं ही नेहमीची समस्या आहे. फोनमध्ये मेमरी कमी असणे किंवा गूगल प्ले स्टोअर मधली मेमरी जास्त असणे.
यासाठी App >All > App cache clear हा उपाय करावा.