शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

PUBG Mobile 2 ची धडाक्यात एन्ट्री होणार; बंदी असूनही बिनदिक्कत खेळता येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 8:11 PM

PUBG Mobile 2 Update claims: PUBG Mobile बनविणारी कंपनी Krafton या गेमच्या दुसऱ्या भागावर काम करत आहे. यामुळे PUBG Mobile 2 लवकरच लाँच होणार आहे.

जगभरात PUBG Mobile कमालीचा लोकप्रिय आहे. भारतातही तरुणांमध्ये पब्जीची प्रचंड क्रेझ होती. परंतू चीनने गलवान खोऱ्यात भारतीय जवानांवर हल्ला केला आणि देशात चीनविरोधात वातावरण तापले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने चीनच्या नाड्या आवळायला सुरुवात केली. चीनची शेकडो अॅप भारतातून पैसा कमावत होती. तसेच माहितीही चोरत होती. यामुळे मोदी सरकारने या अॅपवर बंदी आणली. 

PUBG Mobile बनविणारी कंपनी Krafton या गेमच्या दुसऱ्या भागावर काम करत आहे. यामुळे PUBG Mobile 2 लवकरच लाँच होणार आहे. PlayerIGN नावाच्या गेम्सच्या घडामोडींवर लक्ष ठेवणाऱ्या पोर्टलने याबाबतचे वृत्त दिले आहे. पब्जी पार्ट २ पुढील दोन आठवड्यांत लाँच होणार आहे, असे या पोर्टलने म्हटले आहे. तर याआधी काही वेबसाईटनी दिलेल्या माहितीनुसार पब्जी पार्ट २ जुलैमध्ये लाँच होणार होता. 

PUBG बॅन झाला म्हणून काय झाले? हे एकसो एक गेम आहेत ना...खेळा आनंद लुटा

 

या नव्या अपडेटमध्ये नवीन मानचित्र दिले जाणार आहे. तसेच नवीन स्टाईलसोबत अनेक नवीन फिचर्स मिळणार असल्याचा दावा PlayerIGN ने केला आहे. PUBG Mobile 2 युजर्ससाठी Google Play Store आणि Apple App Store सारख्या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध केले जाणार आहे. PUBG गेम संदर्भात याआधी काही माहिती या वेबसाईटने दिली ती बहुतांश खरी ठरली आहे. भारतात बंदी असली तरीही व्हीपीएनद्वारे अवनेकजण पब्जी हा गेम खेळत आहेत. त्यांना हा नवीन गेम कॉम्प्युटरवर खेळता येणार आहे. कॉम्प्युटर, गेमिंग कन्सोल आणि मोबाईलमध्ये क्रॉस प्लॅटफॉर्मवर हा गेम उपलब्ध होणार आहे. 

केंद्र सरकारने गेल्या वर्षी 118 चिनी अॅपवर बंदी आणताना PUBG Mobile आणि PUBG Mobile Lite वर देखील बंदी आणली होती. यावेळी ही चिनी अॅप देशाची अखंडता आणि संरक्षण विषयक, देशाच्या सुरक्षेसाठी धोक्याची असल्याचे सांगण्यात आले होते. या अॅपद्वारे भारतीयांकडून डेटादेखील मिळविला जात असल्याचा आरोप केला होता. यामुळे देशाच्या सुरक्षेचा मुद्दा असल्याने या चिनी अॅपवर बंदी आणण्यात आली होती. 

टॅग्स :PUBG Gameपबजी गेमchinaचीन