PUBG Mobile भारतात Battlegrounds Mobile India (BGMI) नावाने सादर झाला आहे. परंतु अजूनही अनेक गेम मोड यात डेव्हलपरने दिली नाहीत. आता जागतिक व्हर्जनमधील 7 मोड बॅटल ग्राउंड मोबाईल इंडियामध्ये दिले जातील, याची माहिती गेम डेव्हलपर Krafton ने दिली आहे. हे मोड ‘BGMI Mega modes’ अंतर्गत सादर करण्यात येतील.
बीजीएमआय मेगा मोड अंतर्गत इंफेक्शन मोड, मेट्रो रोयाल आणि विकेंडीचा देखील समावेश असेल. सोशल मीडियावरून माहिती देताना क्रॉफ्टनने Infection Mode, Metro Royale, Payload 2, Runic Power, Survive Till Dawn, Titans: Last Stand, आणि Vikendi हे मोड भारतीय पबजीमध्ये येणार असल्याचे सांगितले आहे. BGMI गेमर्ससाठी हा नवीन अपडेट कधी आणि कशाप्रकारे उपलब्ध होईल, याची माहिती मात्र क्रॉफ्टनने दिली नाही.
या नवीन मोडमध्ये नवीन मॅप आणि गेमप्ले मिळू शकतो. तसेच नवीन हत्यारं आणि गाड्या देखील मिळतील. PUBG Mobile प्रमाणे हे मोड्स अॅक्सेस करण्यासाठी प्लेयर्स एक खास लेव्हल पार करावी लागू शकते.
तसेच क्रॉफ्टनने BGMI वरील हॅकर्स आणि त्रासदायक प्लेयर्सना बॅन केले आहे. डेव्हलपरने घोषणा करून आपल्या सिक्योरिटी सिस्टम आणि कम्यूनिटी मॉनिटरिंगची माहिती दिली आहे. याद्वारे डेव्हलपरने 24 ते 30 सप्टेंबरच्या काळात 87,961 अकॉउंट बॅन केले आहेत. हा बॅन कायमस्वरूपी असेल असे कंपनीने सांगितले आहे.