काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारनं सुरक्षेच्या कारणास्तव PUBG या गेमवर बंदी घातली होती. परंतु आता पुन्हा एकदा हा गेम भारतात पुनरागमनाच्या तयारीत आहे. Battlegrounds Mobile India या नावानं हा गेम पुन्हा भारतीय चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. कंपनीनं नुकतंच पबजी मोबाईल इंडियाच्या सर्व सोशल मीडिया पेजेसचं नाव बदललं आहे आणि कंपनीनं आता रजिस्ट्रेशनचीही घोषणा केली आहे. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार १८ मे पासून गुगल प्ले स्टोअरवर Battlegrounds Mobile India साठी रजिस्ट्रेशनला सुरूवात करण्यात येणार आहे. त्यानंतर हा गेम लाँच करण्यात येईल. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ११८ अन्य अॅप्ससह केंद्र सरकारनं पबजीवर भारतात बंदी धातली होती. दरम्यान, रजिस्ट्रेशन केलं तरी हा गेम केव्हा लाईव्ह केला जाईल याची कोणतीही माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. तसंच iOS बाबतही कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. चाहत्यांसाठी यामध्ये अनेक रिवटर्ड्स ठेवले जाती. तसंच प्री रजिस्टर केल्यासच त्यांना त्याचा फायदा मिळेल. हे रिवॉर्ड्स केवळ भारतीयांसाठीच असतील, असं कंपनीनं स्पष्ट केलं आहे. प्री रजिस्टर करणाऱ्या युझर्सना गुगल स्टोअरवर जावं लागेल आणि त्यानंतर प्री रजिस्टर बटनवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर गेम लाँच झाल्यावर रिवॉर्ड्स क्लेम केले जाऊ शकतात. हा गेम मोफत उपलब्ध असणार आहे.
सुरक्षेची घेणार काळजीगेमर्सचा डेटा कोणत्याही ठिकाणी पाठवला जाणार नाही आणि तो पूर्णपणे सुरक्षित असेल. कंरनी सरकारच्या सर्व गाईडलाईन्सचं पालन करेल. यामध्ये प्रायव्हसी आणि युझर्सच्या सिक्युरिटीचा समावेश असेल, असं कंपनीनं स्पष्ट केलं आहे. ज्या युझर्सचं वय १८ वर्षांपेक्षा कमी आहे त्यांना आपल्या आई-वडिलांचा संपर्क क्रमांक द्यावा लागेल. त्यांच्या फोन क्रमांकाशिवाय तुम्ही साईनअप प्रोसेस करू शकणार नाही. त्यांच्या परवानगीनंतरच १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना हा गेम खेळता येईल असं क्रॉफ्टननं आपल्या प्रायव्हसी पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये म्हटलं आहे.