शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
4
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
5
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
6
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
7
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
8
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
9
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
10
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
11
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
12
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
13
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
14
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
15
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
16
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
17
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
18
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
19
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
20
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती

PUBG Mobile Season 4: लवकरच होणार लाँच, जाणून घ्या खास फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 10:30 AM

लहानग्यांमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या Player Unknown's Battlegrounds (PUBG) या गेमच्या शौकिनांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे.

PUBG Mobile Season 4: लहानग्यांमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या Player Unknown's Battlegrounds (PUBG) या गेमच्या शौकिनांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे. या प्रसिद्ध गेमचा चौथा सीझन लवकरच येणार आहे. कंपनीनं PUBGच्या अपडेट वर्जनची माहिती स्वतःच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. त्यानंतर PUBG गेम खेळणाऱ्या मुलांचाही उत्साह दुणावला आहे. या गेमचा तिसरा सीझन जो Battle Royale Game नावानं प्रसिद्ध आहे, तो गेल्या 18 नोव्हेंबरला संपला आहे. अशातच लवकरच या गेमचा चौथा सीझन येण्याची लहान मुलं वाट पाहत आहेत.   केव्हा येणार चौथा सिझन- PUBGचा नवा सिझन 20 नोव्हेंबरला युजर्सच्या भेटीला येणार आहे. 21 नोव्हेंबर रोजी PUBGचं नव वर्जन ग्लोबल सर्व्हरशी कनेक्ट केलं जाणार असून, त्यानंतर युजर्सना तो गेम खेळता येणार आहे. चौथ्या सिझनमधील PUBG गेम खेळताना जुन्या युजर्सलाही नव्यानं सुरुवात करावी लागणार आहे. त्यामुळे हा गेम खेळण्यासाठी तुम्हाला चौथा सिझन नव्यानं सुरू करावा लागणार आहे. तसेच मॅपच्या दर्जातही कंपनीनं सुधारणा केली आहे. नव्या गेमचं नाव रॉयल पास- PUBG गेमचा हा चौथा सीझन रॉयल पास नावानं ओळखला जाणार आहे. या सीझनमध्ये युजर्सला प्रत्येक आठवड्याला नवं आव्हान मिळणार आहे. तसेच युजर्स 100RP लेव्हलपर्यंत हा गेम खेळू शकणार आहेत. या सीझनमध्ये दोन पर्याय उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यात पहिल्या पर्यायाला इलिट अपग्रेट, दुसरा पर्याय इलिट अपग्रेट प्लस असं नाव देण्यात आलं आहे. दोन्ही कॅटेगरीमध्ये युजर्सला वेगवेगळे फायदे मिळणार आहेत. जसं की 100 यूसी खर्च करण्याचा फायदा मिळणार आहे.ज्यात तुम्ही 100 क्रॉस केल्यानंतर स्पेशल रिवॉर्ड मिळणार आहे. ज्यात पुढील स्टेज अनलॉक करण्याची परवानगी मिळणार आहे. या नवा सीझन फारच रोमांचक असल्याची चर्चा आहे. नव्या सीझनमध्ये युजर्स असॉल्ट रायफल M762चा एक्सेस, नवी शस्त्रास्त्र, पॅराशूटचा वापर, एअरोप्लेन आणि व्हेईकल्स आदी मिळणार आहे. त्याच बरोबर स्कूटर आणि खराब हवामानातही तुम्हाला चांगल्या मॅपची सुविधा मिळणार आहे. लवकरच मोबाईलवर हा गेम खेळता येणार आहे. परंतु अनेक लहान मुलं या गेमच्या आहारी गेली असून, हिंसक कृत्यासाठीही प्रवृत्त होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा गेमच्या आहारी जाणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. 

टॅग्स :PUBG Gameपबजी गेम