नवी दिल्ली- मोबाईलवर इंटरनेटच्या माध्यमातून गेम खेळणं फक्त रिकामा वेळ घालवण्याचं एक साधन समजलं जातं. परंतु आता व्यवसायासाठीही या गेमचा वापर केला जातोय. भारतातही पबजी हा गेम दिवसेंदिवस लोकप्रिय होत चालला आहे. PUBGनं ग्राहकांसाठीही एक खूशखबर दिली आहे. पबजी गेम खेळल्यास आपल्याला 21,990 रुपयांचा Oppo F9 Pro स्मार्टफोन मोफत मिळणार आहे. पबजी मोबाइल इंडिया सीरिज 2019च्या गेममधल्या क्वॉलिफायर राउंडमधले निकाल जाहीर करण्यात आले आहेत. ज्यात 2 हजार लोकांचा समावेश आहे. प्लेऑफ राऊंड 10 फेब्रुवारीपासून 24 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. प्लेऑफ राउंडचं लाइव्ह स्ट्रीमिंग पाहून आपण Oppo F9 Pro हा स्मार्टफोन जिंकू शकता, असं ट्विट कंपनीनं केलं आहे.पबजीनं ट्विट करून सांगितलं आहे. पबजीच्या प्लेऑफ राऊंडची सुरुवात 10 फेब्रुवारीपासून होणार असून, 10 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारीपर्यंत पबजीच्या प्लेऑफ राऊंडचं लाइव्ह स्ट्रीमिंग पाहणाऱ्याला Oppo F9 Pro स्मार्टफोन जिंकता येणार आहे. ज्याची किंमत भारतीय बाजारानुसार 21,999 रुपयांच्या घरात आहे. पबजी गेमच्या क्वॉलिफायर राउंडची सुरुवात 21 जानेवारीला झाली होती आणि 27 जानेवारीला संपली होती.
पबजी न खेळताही मोफत मिळवा 21,990 रुपयांचा Oppo F9 Pro, कंपनीची भन्नाट ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2019 12:42 IST
PUBGनं ग्राहकांसाठीही एक खूशखबर दिली आहे.
पबजी न खेळताही मोफत मिळवा 21,990 रुपयांचा Oppo F9 Pro, कंपनीची भन्नाट ऑफर
ठळक मुद्दे पबजी गेम खेळल्यास आपल्याला 21,990 रुपयांचा Oppo F9 Pro स्मार्टफोन मोफत मिळणार आहे. पबजी मोबाइल इंडिया सीरिज 2019च्या गेममधल्या क्वॉलिफायर राउंडमधले निकाल जाहीर करण्यात आले आहेत.प्लेऑफ राऊंड 10 फेब्रुवारीपासून 24 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. प्लेऑफ राउंडचं लाइव्ह स्ट्रीमिंग पाहून आपण Oppo F9 Pro हा स्मार्टफोन जिंकू शकता