अँड्रॉइड स्मार्टफोन्ससाठी प्रोसेसर बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये क्वॉलकॉमचं पहिल्या स्थानी येतं. Qualcomm नं शुक्रवारी आपले दोन लेटेस्ट प्रोसेसर सादर केले आहेत, ज्यांची नावं Snapdragon 8+ Gen 1 आणि Snapdragon 7 Gen 1 अशी आहेत. फ्लॅगशिप स्मार्टफोन्समध्ये Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर वापरला जाईल तर मिड रेंज स्मार्टफोन्स 7 सीरीजच्या Snapdragon 7 Gen 1 प्रोसेसर मिड-रेंज स्मार्टफोनमध्ये दिला जाईल.
या स्मार्टफोनमध्ये मिळतील नवीन प्रोसेसर
Asus ROG, Black Shark, Honor, iQoo, Lenovo, Motorola, Nubia, OnePlus, Oppo, Realme, Redmi, Vivo, Xiaomi आणि ZTE सारखे ब्रँड्सच्या स्मार्टफोन्समध्ये नवीन प्रोसेसर वापरले जातील. Qualcomm नं दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी तिसऱ्या तिमाहीत हे स्मार्टफोन्स येऊ शकतात. टिप्सटरन अभिषेक यादवनं Snapdragon 8+ Gen 1 चिपसेटसह येणाऱ्या फोन्सची यादी दिली आहे.
- Samsung Z Fold 4
- Samsung Z Flip 4
- Xiaomi 12 Ultra
- Realme GT 2 Master Explorer Edition
- OnePlus 10 Ultra
- iQOO 10 Pro
- OSOM Privacy
- Motorola Frontier
Snapdragon 8+ Gen 1 Specifications
Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर जुन्या Snapdragon 8 Gen 1 चिपसेटचा अपग्रेड व्हर्जन असेल. त्यामुळे यात 10 टक्के वेगवान सीपीयू परफॉर्मन्स मिळेल. तसेच, यात Kryo CPU आणि Adreno GPU मिळेल. हा सिंगल चार्जवर 60 मिनिट्स जास्त गेम प्ले मिळेल. कंपनीनं यात 4th जनरेशन Snapdragon X65 5G Modem-RF System चा वापर केला आहे, जी 10Gbps पर्यंतच्या 5G स्पीड देते.
Snapdragon 7 Gen 1 Specifications
Snapdragon 7 Gen 1 प्रोसेसर Snapdragon 778G चिपसेटची जागा घेईल. नव्या प्रोसेसरसह Adreno 662 GPU मिळतो, जो 20 टक्के जास्त वेगाने परफॉर्मन्स डिलिव्हर करतो. हा ड्युअल 5जी कनेक्टिव्हिटी आणि 4.4Gbps डाउनलोड स्पीडसह येईल. यात WiFi-6E आणि Bluetooth 5.3 सपोर्ट मिळतो. या प्रोसेसरसह 16GB LPDDR5 RAM दिला जाऊ शकतो.