Realme ने सध्या 5G स्मार्टफोनवर लक्ष केंद्रित करणार आहे. यासाठी कंपनी एक मोठी योजना बनवली आहे. कंपनी पुढल्यावर्षी भारतात आपला स्वस्त 5G स्मार्टफोन सादर करू शकते. हा स्मार्टफोन बाजारात दाखल झाल्यास स्मार्टफोन बाजाराची दिशा बदलू शकते. कंपनीचे सीईओ माधव सेठ यांनी बुधवारी एका वेबिनारमध्ये माहिती दिली कि कंपनी साल 2022 मध्ये 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत 5G स्मार्टफोन्स लाँच करणार आहे. त्याचबरोबर भविष्यात 15 हजार रुपयांपेक्षा जास्त किंमतीत येणाऱ्या सर्व रियलमी स्मार्टफोनमध्ये 5G ची क्षमता असेल. (Realme 5G phones under Rs 10000 price segment India launch 2022)
सध्या रियलमीचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन 13,999 रुपयांमध्ये मिळतो. Realme 8 5G कंपनीचा सर्वात स्वस्त 5G फोन आहे. भारतात सर्वात पहिला 5G फोन लाँच करण्याचा मान देखील गेल्यावर्षी रियलमीने X50 Pro 5G लाँच करून मिळवला होता. सध्या कंपनीच्या 5G स्मार्टफोन पोर्टफोलियोमध्ये रियलमी 8 5G, नारजो 30 प्रो 5G आणि रियलमी X7 मॅक्स 5G अश्या स्मार्टफोन्सचा समावेश आहे.
माधव सेठ यांनी सांगितले आहे कि जगभरातील लोकांना परवडणाऱ्या किंमतीत टेक्नॉलॉजी मिळावी यासाठी कंपनीने आपली 90% R&D साधने 5G मध्ये गुंतवली आहेत. यामुळे लवकरच 5G डिवाइस स्वस्तात उपलब्ध होतील आणि यातील काही स्मार्टफोन्स Narzo सीरीज अंतगर्त लाँच होतील.