मुंबई: स्मार्टफोन क्षेत्रात वेगानं वाटचाल करणाऱ्या Realme कंपनीनं Realme 5i फोन भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. आज पहिल्यांदाच भारतात हा फोन सेलसाठी उपलब्ध होईल. थोड्याच वेळात म्हणजेच दुपारी १२ वाजता फ्लिपकार्ट आणि रिअलमीच्या संकेतस्थळांवर या फोनची विक्री सुरू होईल. ५००० मेगाहर्ट्झची बॅटरी, क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप असे दमदार फिचर्स या फोनमध्ये देण्यात आले आहेत. Realme 5i स्मार्टफोन Realme 5 चं अपग्रेडेड व्हर्जन आहे. Realme 5i भारतीय बाजारात येत असल्यानं आता कंपनीकडून Realme 5 ची विक्री बंद केली जाण्याची शक्यता आहे. कंपनी Realme 5i दोन रंगात भारतीय बाजारात आणणार आहे. अॅक्वा ब्ल्यू आणि फॉरेस्ट ग्रीन रंगात हा फोन उपलब्ध असेल. या फोनची किंमत ८,९९९ रुपये इतकी असणार आहे. फ्लिपकार्टवरुन Realme 5i विकत घेतल्यास जिओच्या ग्राहकांना ७,५५० रुपयांचे लाभ मिळू शकतात. याशिवाय रिअलमीच्या अधिकृत संकेतस्थळावरुन मोबीक्विकच्या माध्यमातून फोन विकत घेतल्यास १ हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतं. याशिवाय ५०० रुपयांचं अतिरिक्त कॅशबॅकदेखील मिळू शकतं. Realme 5i मध्ये 720x1600 पिक्सल स्क्रीन रेझोल्युशन देण्यात आलं आहे. या फोनची स्क्रीन ६.५२ इंचाची असून ती एचडी प्लस आहे. फोनमध्ये अॅड्रॉईंड ९ पाय देण्यात सिस्टिम देण्यात आली आहे. Realme 5i मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६६५ चिपसेट देण्यात आला आहे. यामध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबीची इंटर्नट मेमरी देण्यात आली असून ती एसडी कार्डच्या मदतीनं २५६ जीबीपर्यंत वाढवण्यात येऊ शकते. Realme 5i मध्ये क्वॉड रिअर कॅमरा सेटअट देण्यात आला आहे. यात १२ मेगापिक्सलचं प्रायमरी सेन्सर, ८ मेगापिक्सलची वाईड अँगल लेन्स, २ मेगापिक्सलचा पोट्रेट सेन्सर आणि २ मेगापिक्सलच्या मॅक्रो लेन्सचा समावेश आहे. व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सरदेखील असून ५ हजार एमएचची बॅटरी आहे. हा फोनमध्ये १० वॉट चार्जिंगला सपोर्ट करतो.
फिचर्स दमदार, किंमत फक्त नऊ हजार; Realme 5i थोड्याच वेळात विक्रीसाठी उपलब्ध होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 11:46 AM