शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Realme 6 pro, Realme 6 आणि Realme Band लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2020 4:25 PM

Corona Virus कोरोना व्हायरसमुळे कंपनीने इव्हेंट रद्द करत ऑनलाईन लाँचिंग केले आहे.

ठळक मुद्देया फोनमध्ये भारतीय नेव्हीगेशन सिस्टिम नाविकही मिळणार आहे.फोन लाईटनिंग ब्लू आणि ऑरेंज कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल.दोन्ही फोनची बॅटरी चार्ज करण्यासाठी 30 वॉटचा फास्ट चार्जर मिळणार आहे.

चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी रियलमीने भारतात Realme 6 श्रेणी सुरू केली आहे. रिअलमी 6 सिरीज अंतर्गत कंपनीने रिअलमी 6 प्रो आणि रिअलमी 6 स्मार्टफोन सादर केले आहेत. या दोन फोनशिवाय कंपनीने रिअलमी बँडसुद्धा सादर केला आहे. कोरोना व्हायरसमुळे कंपनीने इव्हेंट रद्द करत ऑनलाईन लाँचिंग केले आहे.

रिअलमी 6 प्रोमध्ये 6.6 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात येणार आहे. याशिवाय या फोनमध्ये भारतीय नेव्हीगेशन सिस्टिम नाविकही मिळणार आहे. हा फोन लाईटनिंग ब्लू आणि ऑरेंज कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. या फोनमध्ये चार रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. यामध्ये एक लेन्स 64 मेगापिक्सल, दुसरी 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाईड, तिसरा दोन मेगापिक्सलचा मॅक्रो आणि चौथा 8 मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स आहे. 

या फोनमध्ये इन डिस्प्ले ड्युअल फ्रंट कॅमेरा असून मुख्य कॅमेरा 16 मेगापिक्सल आणि दुसरा 8 मेगापिक्सल वाईड अँगल कॅमेरा आहे. या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 720 जी प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 4300 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनच्या पॉवर बटनावरच फिंगर प्रिंट सेन्सर असणार आहे. 

रिअलमी 6 मध्ये 5.3 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. दोन्ही फोनची बॅटरी चार्ज करण्यासाठी 30 वॉटचा फास्ट चार्जर मिळणार आहे. Realme Band कंपनीचा पहिला स्मार्ट बँड आहे. यामध्ये 2.4 cm कलर डिस्प्ले मिळणार आहे. यामध्ये 5 डायल फेस मिळणार. तसेच यामध्ये 9 स्पोर्टस मोड देण्यात आले आहेत. बँडमध्ये हार्ट रेट मॉनिटरशिवाय स्मार्ट नोटिफिकेशन, स्लीप मॉनिटरिंग मिळणार आहे. या बँडमध्ये वॉटरप्रूफ आणि डस्टप्रूफ IP68 ची रेटिंग मिळणार आहे. यामध्ये चार्जिंगसाठी युएसबी पोर्ट आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही एडाप्टर चार्ज करू शकता. 

रिअलमी बँडची किंमत 1499 रुपये असून याची विक्री अमेझॉनवर सुरू झाली आहे. तर Realme 6 Pro ची किंमत 16,999 ते 18999 रुपये आहे. Realme 6 ची किंमत 12999 ते 15999 रुपये आहे. या दोन्ही फोनची विक्री फ्लिपकार्टवर केली जाणार आहे. 

टॅग्स :realmeरियलमीMobileमोबाइल