रियलमीच्या ‘रियलमी 8’ सीरिजमधील दोन स्मार्टफोन भारतीय लाँचच्या उंबरठ्यावर आहेत. येत्या 9 सप्टेंबरला कंपनीचे दोन स्मार्टफोन्स Realme 8i आणि Realme 8s 5G देशात लाँच केले जाणार आहेत. कंपनीने या स्मटफोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती सोशल मीडिया आणि फ्लिपकार्टवरील मायक्रोसाईटच्या माध्यमातून दिली आहे. परंतु आता लाँच होण्याआधीच Realme 8i स्मार्टफोनच्या किंमतीची माहिती समोर आली आहे.
Realme 8i ची संभाव्य किंमत
टिप्सटर सुधांशुने सांगितले आहे कि रियलमी 8आई स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये सादर केला जाईल. यातील छोटा 4GB RAM व 64GB storage व्हेरिएंट 199 यूरो (17,300 रुपये) मध्ये सादर केला जाऊ शकतो. तर 4GB RAM आणि 128GB storage व्हेरिएंटसाठी 219 युरो (19,000) रुपये मोजावे लागू शकतात. हा फोन Stellar Black आणि Stellar Purple रंगात उपलब्ध होईल. याआधी आलेल्या लिक्सनुसार हा फोन दहा हजारांच्या बजेटमध्ये सादर होणे अपेक्षित होते.
Realme 8i चे स्पेसिफिकेशन्स
Realme 8i स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला मोठा डिस्प्ले मिळेल, असे कंपनीने सांगितले आहे. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये MediaTek Helio G96 प्रोसेसर दिला जाईल. या चिपसेटसह भारतात येणारा हा पहिला फोन आहे. रियलमी 8आय गेमिंग मोड आणि डायनॉमिक रॅम एक्सपान्शन टेक्नॉलॉजीसह सादर केला जाऊ शकतो. या फोनमध्ये 50 मेगापिक्सल सेन्सरसह ट्रिपल रियर कॅमेरा आणि 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 18वॉट फास्ट चार्जिंगसह 5,000एमएएचची बॅटरी मिळू शकते.