रियलमी दोन नवीन लो बजेट स्मार्टफोनवर काम करत असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. हे लो बजेट स्मार्टफोन भारतात लाँच केले जाऊ शकतात. रिपोर्ट्सनुसार Realme 8, 8 5G आणि 8 Pro स्मार्टफोन्सनंतर Realme 8s आणि Realme 8i हे स्मार्टफोन बाजारात येऊ शकतात. आता या सीरीजमधील रियलमी 8एस संबंधित माहिती समोर आली आहे कि, हा फोन 5G सपोर्ट आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह सादर केला जाऊ शकतो.
Realme 8s ची डिजाइन?
91मोबाईल्सने Realme 8s च्या डिजाईनची माहिती दिली आहे, हा फोन सीरीजमधील इतर स्मार्टफोन्ससारखा दिसेल. फोनच्या बॅक पॅनलवर चौरसाकृती ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. डिवाइसच्या डावीकडे वॉल्यूम रॉकर तर उजवीकडे फिंगरप्रिंट सेन्सर एम्बडेड पावर बटण आणि सिम ट्रे मिळेल. फोनच्या तळाला स्पिकर ग्रिल, USB Type-C पोर्ट, 3.5mm ऑडियो जॅक आणि माइक्रोफोन देण्यात येईल.
Realme 8s चे स्पेसिफिकेशन्स
समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार, Realme 8s मध्ये 6.5-इंचाचा 90Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले देण्यात येईल. या फोनमध्ये MediaTek Dimensity 810 प्रोसेसर आणि 5G कनेक्टिविटी मिळेल. हा फोन 6GB आणि 8GB रॅम ऑप्शन्ससह बाजारात येईल, सोबत 5GB वर्च्युल रॅम देण्यात येईल. या रियलमी स्मार्टफोनमध्ये 128GB आणि 256GB स्टोरेज मिळू शकते.
Realme 8s स्मार्टफोन Android 11 आधारित Realme UI 2.0 वर चालेल. या फोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 64MP चा मुख्य कॅमेरा सेन्सर मिळेल. बाकी दोन सेंसर्सची माहिती मिळाली नाही. परंतु या फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा असू शकतो. Realme 8s स्मार्टफोन 5000mAh ची बॅटरी 33W डार्ट फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात येईल.