Realme भारतात मीडियाटेक डायमेंसिटी 810 प्रोसेसरसह आपला पहिला 5जी फोन भारतात लाँच करणार आहे. ही घोषणा Realme आणि MediaTek ने एकसाथ केली आहे. या स्मार्टफोनचे नाव मात्र अजूनही गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. परंतु हा एक वेगवान, दीर्घकाळ बॅटरी लाइफ आणि गेम्समध्ये जास्त FPS सह ऑल राऊंड एक्सपीरियंस देणारा फोन असेल, असे सांगण्यात आले आहे. रिपोर्ट्सनुसार हा फोन Realme 8s नावाने सादर केला जाईल.
काही दिवसांपूर्वी रियलमीचे सीईओ माधव सेठ यांनी दोन नव्या स्मार्टफोन्सची माहिती दिली होती. हे दोन स्मार्टफोन्स Realme 8i आणि Realme 8s नावाने सादर केले जातील. हे फोन्स अनुक्रमे Dimensity 920 आणि Dimensity 810 सह सादर केला जाऊ शकतात. डायमेंसिटी 810 आणि डायमेंसिटी 920 हे दोन्ही प्रोसेसर 5जी कनेक्टिविटी आणि 120 हर्ट्ज डिस्प्लेला सपोर्ट करतील.
Realme 8s चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
रियलमी 8एस स्मार्टफोनमध्ये 90हर्ट्ज रिफ्रेश रेटसह 6.5 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. या फोनमध्ये मीडियाटेकचा डायमनसिटी 810 चिपसेट 5G कनेक्टीव्हीसह दिला जाऊ शकतो. हा फोन 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंतची स्टोरेज मिळू शकते. हा नवीन रियलमी फोन अँड्रॉइड 11 आधारित रियलमी युआय 2.0 सह येईल.
Realme 8s मधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा दिला जाऊ शकतो. या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. तसेच या रियलमी फोनमधील 5,000एमएएचची बॅटरी 33वॉट डार्ट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. या फोनची प्रारंभिक किंमत 15,000 रुपयांच्या आसपास असू शकते.