Realme 9 4G स्मार्टफोन गेले कित्येक दिवस चर्चेचा विषय बनला आहे. या फोनमध्ये 108MP चा जगातील सर्वात मोठा कॅमेरा सेन्सर देण्यात येईल, अशी बातमी याआधीच आली आहे. आता या स्मार्टफोनच्या इंडोनेशियन लाँचचा पोस्टर ऑनलाईन लीक झाला आहे. या पोस्टरवरून फक्त मोबाईलचा लाँच निश्चित झाला नाही तर फोनच्या कलर व्हेरिएंटची माहिती देखील मिळाली आहे.
टिप्सटर अनुज अत्रीनं Realme 9 4G च्या इंडोनेशियन लाँचचा पोस्टर शेयर केला आहे. या पोस्टरमध्ये फोनच्या तीन कलर व्हेरिएंटची माहिती मिळाली आहे. हा डिवाइस ब्लॅक, व्हाईट आणि गोल्डन कलरमध्ये सादर केला जाईल. पोस्टरवरून फोनच्या स्पेसिफिकेशनची माहिती मिळाली आहे. लवकरच हा स्मार्टफोन भारतीयांच्या भेटीला देखील येईल.
Realme 9 4G चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
लिक्सनुसार, रियलमी 9 4जी फोनमध्ये सुपर अॅमोलेड डिस्प्ले देण्यात येईल, जो 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. या स्मार्टफोनमध्ये Snapdragon प्रोसेसर देण्यात येईल. या स्मार्टफोनचे दोन रॅम व्हेरिएंट बाजारात येतील, ज्यात 6GB आणि 8GB RAM असेल. दोन्ही व्हेरिएंटमध्ये 128GB स्टोरेज मिळेल. फोटोग्राफीसाठी या आगामी रियलमी फोनमध्ये 108MP च्या मुख्य कॅमेऱ्यासह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. तसेच, फ्रंटला 16MP चा सेन्सर सेल्फी कॅप्चर करेल. या फोनमध्ये 5,000mAh ची मोठी बॅटरी मिळू शकते , जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.
कंपनीनं मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. परंतु मीडिया रिपोर्ट्समध्ये या स्मार्टफोनसाठी दोन नावं समोर आली आहेत. हा फोन Realme 9 4G म्हणून भारतात दाखल होऊ शकतो किंवा एसई व्हर्जन प्रमाणे कंपनी या स्मार्टफोनला Realme 9 SuperZoom असं नाव देखील देऊ शकते. आतापर्यंत आलेल्या Realme 9 सीरिजच्या कोणत्याही स्मार्टफोनमध्ये जगातील सर्वात मोठा फोन कॅमेरा देण्यात आला नाही. परंतु Realme 8 Pro मध्ये कंपनीनं 108MP चा सेन्सर दिला होता.