गेले कित्येक दिवस Realme 9 4G स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची माहिती समोर येत आहे. हा फोन 108MP चा कॅमेरा असलेला सर्वात स्वस्त स्मार्टफोन असेल, अशी चर्चा आहे. आता स्वतः रियलमी इंडियानं ट्वीट करून सांगितले आहे की, हा स्मार्टफोन 7 एप्रिलला भारतात सादर करण्यात येईल. त्याचबरोबर फ्लॅगशिप Realme GT 2 Pro, Realme Book Prime लॅपटॉप, Realme Buds Air 3, आणि Realme FHD TV Stick देखील भारतीयांच्या भेटीला येतील.
Realme India च्या ट्विटर अकॉउंटवरून कंपनीनं बहुप्रतीक्षित Realme 9 4G स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची माहिती दिली आहे. येत्या 7 एप्रिलला दुपारी 12:30 PM वाजता आयोजित करण्यात येणाऱ्या लाँच इव्हेंटमधून हा फोन सादर केला जाईल. Realme 9 4G मधील 108MP ISOCELL HM6 इमेज सेन्सरला देखील कंपनीनं दुजोरा दिला आहे.
Realme 9 4G चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
लिक्सनुसार, रियलमी 9 4जी फोनमध्ये सुपर अॅमोलेड डिस्प्ले देण्यात येईल, जो 90Hz रिफ्रेश रेट, 360Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 1,000 नीट्स ब्राईटनेसला सपोर्ट करेल. या स्मार्टफोनमध्ये Snapdragon प्रोसेसर देण्यात येईल. या स्मार्टफोनचे दोन रॅम व्हेरिएंट बाजारात येतील, ज्यात 6GB आणि 8GB RAM असेल. दोन्ही व्हेरिएंटमध्ये 128GB स्टोरेज मिळेल.
फोटोग्राफीसाठी या आगामी रियलमी फोनमध्ये 108MP च्या मुख्य कॅमेऱ्यासह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. तसेच, फ्रंटला 16MP चा सेन्सर सेल्फी कॅप्चर करेल. या फोनमध्ये 5,000mAh ची मोठी बॅटरी मिळू शकते, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात येईल.