Realme 9 सीरिज अंतर्गत तीन स्मार्टफोन भारतीयांच्या भेटीला आले आहेत. यात Realme 9i, Realme 9 Pro आणि Realme 9 Pro+ स्मार्टफोनचा समावेश आहे. येत्या 10 मार्चला या सीरिजचा विस्तार कंपनी करणार आहे. सीरिजमध्ये Realme 9 5G आणि Realme 9 5G SE स्मार्टफोनची एंट्री होईल. याची माहिती कंपनीच्या वेबसाईटवरून मिळाली आहे. वेबसाईटवरून डिजाइन समजली आहे परंतु स्पेक्स अजूनही स्पष्ट झाले नाहीत.
Realme 9 5G आणि Realme 9 5G SE चे संभाव्य स्पेक्स
वेबसाईटवर एक डिवाइसमध्ये Qualcomm Snapdragon 778 5G प्रोसेसर असेल आणि दुसरा फोन MediaTek Dimensity 810 5G प्रोसेसरसह येईल, असं सांगण्यात आलं आहे. हे दोन्ही चिपसेट 6nm प्रोसेसवर बनवण्यात आले आहेत. तसेच Realme 9 5G SE स्मार्टफोनच्या 144Hz रिफ्रेश रेट सपोर्ट असेल्या डिस्प्लेची माहिती देखील मिळाली आहे.
लिक्सनुसार Realme 9 5G मध्ये MediaTek Dimensity 810 5G प्रोसेसर मिळेल, सोबत 8GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज मिळेल. फोटोग्राफीसाठी 48MP चा प्रायमरी कॅमेरा, 2MP ची मॅक्रो लेन्स आणि 2MP चा डेप्थ सेन्सर मिळेल. फोनमध्ये 16MP चा सेल्फी कॅमेरा मिळेल. यातील 5000mAh बॅटरी आणि 18W चार्जिंगला सपोर्ट करेल.
रियलमीचे व्हीपी माधव सेठ यांच्या मते, Realme 9 Series चे नवीन डिवाइस 15,000 रुपयांपेक्षा जास्त किंमतीत सादर केले जातील. म्हणजे हे फोन्स मिड-रेंज सेग्मेंटमध्ये 5G चा अनुभव देतील.
हे देखील वाचा: