Realme 9 Pro Series लवकरच भारतात Realme 9 Pro 5G आणि Realme 9 Pro+ 5G या दोन स्मार्टफोन्ससह सादर केली जाईल. रियलमीचे सीईओ माधव सेठ यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही सीरिज 16 फेब्रुवारीला भारतीयांच्या भेटीला येईल. तसेच या सीरिजची किंमत 15000 रुपयांपेक्षा जास्त असेल. विशेष म्हणजे हे दोन्ही फोन्स भारतासह जगभरात एकाच वेळी लाँच केले जातील.
Realme 9 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स
Realme 9 Pro 5G मध्ये 6.59 इंचाचा फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्ले मिळू शकतो. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह येईल. यात Qualcomm Snapdragon 695 चिपसेटसह 8GB पर्यंत RAM आणि 128GB स्टोरेज मिळू शकते. फोनच्या मागे 64MP चा मेन कॅमेरा, 8MP चा अल्ट्रा वाईड अँगल सेन्सर आणि 2MP ची मॅक्रो लेन्स मिळेल. समोर 16MP चा सेल्फी शुटर मिळेल. या फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh ची बॅटरी मिळू शकते.
Realme 9 Pro+ 5G चे स्पेसिफिकेशन्स
Realme 9 Pro+ फोनमध्ये 50MP चा Sony IMX766 मेन कॅमेरा मिळेल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 16MP चा कॅमेरा मिळू शकतो. या डिवाइसमध्ये MediaTek Dimensity 920 प्रोसेसर मिळेल. हा फोन हार्ट रेट सेन्सरसह येईल, असं कंपनीनं सांगितलं आहे. यात 8GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंतची स्टोरेज मिळू शकते. हा फोन 6.43 इंचाच्या फुलएचडी+ अॅमोलेड डिस्प्ले मिळू शकतो, जो 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. यात 65W फास्ट चार्जिंग असलेली 4500mAh ची बॅटरी देण्यात येईल.
हे देखील वाचा:
- Xiaomi च्या फोन्सना मिळणार नवीन ऑपरेटिंग सिस्टम; रेडमीच्या ‘या’ फोन्समध्ये येतोय MIUI 13 चा अपडेट
- Best Smart TV Under 20000: हे आहेत 20 हजारांच्या आत येणारे बेस्ट स्मार्ट टीव्ही; Flipkart Sale मध्ये मिळतायत जबरदस्त ऑफर्स