Realme 9, Realme XT 3, आणि Realme GT 2 स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच केला जाऊ शकतात. हे तिन्ही स्मार्टफोनरियलमी इंडियाच्या वेबसाइटवर लिस्ट केले गेले आहेत. रियलमीच्या आगामी स्मार्टफोनची लिस्टिंग सर्वप्रथम टिपस्टर मुकुल शर्मा या प्रसिद्ध टिपस्टरने पहिली आहे. या तिन्ही रियलमी स्मार्टफोन पैकी Realme 9 कंपनी लाँच करण्याची शक्यता जास्त आहे परंतु, उर्वरित दोन स्मार्टफोनच्या लाँचबाबत सध्या काही बोलणे चुकीचे ठरेल. (Realme 9, Realme XT 3, Realme GT 2 spotted on Realme India website launch is near)
Realme 9, Realme XT 3, Realme GT 2 लवकरच होतील लाँच
रियलमी या महिन्यात भारतात Realme GT 5G लाँच करेल, हि माहिती कंपनीनेच दिली आहे. त्यामुळे हा तो फोन असेल जो Realme GT 2 म्हणून लिस्ट झाला असेल. Realme XT 3 स्मार्टफोनची माहिती मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे. कंपनीने Realme XT स्मार्टफोन भारतात 2019 मध्ये लाँच केला होता. त्यानंतर कंपनीने दुसरा कोणताही XT डिवाइस भारतात लाँच केला नाही.
Realme 9, Realme XT 3, आणि Realme GT 2 च्या भारतातील लाँचबाबत कंपनीने अधिकृतपणे कोणतीही माहिती दिली नाही. लिस्टिंगनुसार, Realme XT 3 स्मार्टफोन 10,999 रुपयांमध्ये सादर केला जाऊ शकतो.
Realme GT 5G स्पेसिफिकेशन्स
वर सांगितल्याप्रमाणे Realme GT 5G स्मार्टफोन जूनमध्ये लाँच केला जाऊ शकतो. रियलमी हा स्मार्टफोन Global 5G Summit दरम्यान लाँच करू शकते. Realme GT 5G स्मार्टफोनचे फीचर्स पाहता यात 6.43-इंचाचा सुपर अॅमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि रिजोल्यूशन FHD+ असू शकते. रियलमीचा हा स्मार्टफोन Snapdragon 888 चिपसेटसह 12GB RAM आणि 256GB इंटरनल स्टोरेजसह सादर केला जाऊ शकतो. इतर स्पेसिफिकेशन्स पाहता यात 64MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि 4,500mAh बॅटरी 65W फास्ट चार्जिंगसह मिळू शकते.