Realme नं आपल्या Realme 9 सीरिजमध्ये चार फोन्स सादर केले आहेत. कंपनीनं Realme 9 5G, Realme 9 SE, Realme 9 Pro आणि Realme 9 Pro+ स्मार्टफोन या लाईनअपमध्ये उतरवले आहेत. परंतु या सीरिजमध्ये आणखी एका मोबाईलची एंट्री होऊ शकते, अशी माहिती 91mobiles नं सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. रियलमी लवकरच भारतात Realme 9 सीरीजचा नवीन स्मार्टफोन 108 मेगापिक्सलच्या रियर कॅमेरा सेटअपसह सादर करू शकते.
108MP चा कॅमेरा असलेला रियलमी फोन
कंपनीनं मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. परंतु मीडिया रिपोर्ट्समध्ये या स्मार्टफोनसाठी दोन नावं समोर आली आहेत. हा फोन Realme 9 4G म्हणून भारतात दाखल होऊ शकतो किंवा एसई व्हर्जन प्रमाणे कंपनी या स्मार्टफोनला Realme 9 SuperZoom असं नाव देखील देऊ शकते. आतापर्यंत आलेल्या Realme 9 सीरिजच्या कोणत्याही स्मार्टफोनमध्ये जगातील सर्वात मोठा फोन कॅमेरा देण्यात आला नाही. परंतु Realme 8 Pro मध्ये कंपनीनं 108MP चा सेन्सर दिला होता.
Realme 9 Pro Plus चे स्पेसिफिकेशन्स
रियलमी 9 प्रो प्लस स्मार्टफोन 6.4 इंचाच्या फुलएचडी+ अॅमोलेड डिस्प्लेसह बाजारात आला आहे. जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी यात इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला देखील सपोर्ट करतो. सोबत बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स कंपनीनं दिले आहेत.
हा डिवाइस अँड्रॉइड 12 बेस्ड रियलमी युआय वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये 2.5गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह MediaTek Dimensity 920 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी माली-जी68 एमसी4 जीपीयू मिळतो. सोबत 8GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे.
फोटोग्राफीसाठी रियलमी 9 प्रो+ स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅश, 50 मेगापिक्सलचा प्रायमरी Sony IMX766 सेन्सर, 8 मेगापिक्सलची वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सलचा Sony IMX471 सेन्सर फ्रंटला देण्यात आला आहे.पावर बॅकअपसाठी रियलमी 9 प्रो+ मध्ये 4,500एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 60W SuperDart चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.