Realme Phone: Realme लवकरच आपली बजेट स्मार्टफोन सीरिज बाजारात आणणार आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीनं आगामी Realme 9 स्मार्टफोनच्या लाँचची माहिती दिली होती. तसेच गेल्या महिन्यात Realme 9 series चा एक स्मार्टफोन सर्टिफिकेशन वेबसाईट्सवर देखील दिसला होता. तर आता 91mobiles आणि टिपस्टर मुकुल शर्माच्या हवाल्याने Realme 9 series च्या भारतीय लाँचची माहिती दिली आहे.
मुकुलनं दिलेल्या माहितीनुसार, Realme 9 series अंतर्गत Realme 9, Realme 9 Pro, Realme 9 Pro+ किंवा Max, आणि Realme 9i असे चार फोन सादर केले जातील. ही सीरिज पुढील वर्षी ग्राहकांच्या भेटीला येईल. यातील दोन फोन जानेवारीच्या अखेरीस आणि दोन फोन फेब्रुवारीच्या सुरुवातीला सादर केले जाऊ शकतात, असं शर्मानं सांगितलं आहे.
Realme 9 Pro+ स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी IMEI डेटाबेसमध्ये मॉडेल नंबर RMX3393 सह लिस्ट करण्यात आला आहे. हा Realme 9 series मधील एक हाय-एन्ड स्मार्टफोन वाटत आहे. त्यामुळे यात हाय-एन्ड स्पेसिफिकेशन्स मिळू शकतात. ज्यात AMOLED डिस्प्ले, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 870 चिपसेट आणि 108MP कॅमेऱ्याचा समावेश असू शकतो.
Realme 9 Pro+ स्मार्टफोन EEC पोर्टलवर Realme 9i स्मार्टफोनसह स्पॉट केला गेला आहे. Realme 9i स्मार्टफोनचा मॉडेल नंबर RMX3491 आहे, जो एक बजेट फोन असू शकतो. या फोनची जास्त माहिती लीक झालेली नाही.