Realme 9i Price: Realme नं गेले कित्येक दिवस चर्चेत राहिलेला ‘रियलमी 9 सीरीज’ चा नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीनं Realme 9i स्मार्टफोन सध्या व्हिएतनाममध्ये सादर करण्यात आला आहे. लवकरच हा फोन Snapdragon 680 चिपसेट, 6GB RAM, 50MP Camera, 33W fast charging आणि 5,000mAh battery सह भारतासह जगभरात देखील सादर केला जाऊ शकतो.
Realme 9i चे स्पेसिफिकेशन्स
रियलमी 9आय कंपनीनं 6.6 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह सादर केला आहे. हा पंच-होल असलेला आयपीएस एलसीडी पॅनल 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा मोबाईल अँड्रॉइड 11 बेस्ड रियलमी युआय 2.0 वर चालतो. याला प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 680 चिपसेटची पॉवर देण्यात आली आहे. सोबत 6 जीबी रॅम +5 जीबी वर्चुअल वचुर्अल रॅम असा एकूण 11जीबी रॅम देण्यात आला आहे. यात 128 जीबी इंटरनल स्टोरेज देखील आहे.
रियलमी 9आय मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. तसेच 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा ब्लॅक अँड व्हाईट सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. साईड माउंटेड फिंगरप्रिंटसह आलेला हा फोन 5000mAh च्या बॅटरीला सपोर्ट करतो, जी 33W फास्ट चार्जिंग स्पीडनं चार्ज करता येते.
Realme 9i ची किंमत
रियलमी 9आय स्मार्टफोन व्हिएतनाममध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेजसह आला आहे. तिचे याची किंमत 6,490,000 VND इतकी ठेवण्यात आली आहे. ही किंमत 21,500 रुपयांच्या आसपास रूपांतरित होते.
हे देखील वाचा:
28 हजारांत iPhone तर 7 हजारांत अँड्रॉइड; 10 स्मार्टफोनवर मिळतायत ढासू ऑफर
8GB रॅम, 5000mAh बॅटरीसह आला Vivo Y33T फोन; शाओमी-रियलमीची करणार सुट्टी