Realme नं नवीन लॅपटॉप लाँच केला आहे. याचं नाव कंपनीनं Realme Book Enhanced Edition Air असं ठेवलं आहे. हा याआधी आलेल्या Realme Book Enhanced Edition चा लाईट व्हर्जन आहे. कंपनीनं या लॅपटॉपचं वजन कमी ठेवलं आहे. इतर स्पेक्समध्ये मात्र कंपनीनं जास्त बदल केला नाही.
Realme Book Enhanced Edition Air ची किंमत
नवीन Realme Book सध्या फक्त चीनमध्ये सादर करण्यात आला आहे. तिथे याची किंमत 4699 युआन (जवळपास 55000 रुपये) ठेवण्यात आली आहे. चीनमध्ये हा लॅपटॉप आता प्री-बुक करण्यासाठी उपलब्ध झाला आहे. तिथे हा लॅपटॉप फक्त 1000 युआन अर्थात 1200 रुपयांमध्ये बुक करता येईल.
लॅपटॉपचा एक सिंगल व्हेरिएंट 16GB RAM आणि 512GB स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. हा लॅपटॉप 2 स्काय ब्लू आणि आयलंड ग्रे अशा दोन कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल. भारतात हा लॅपटॉप कधी येईल याची माहिती मात्र अजून समोर आली नाही.
Realme Book Enhanced Edition Air चे स्पेसिफिकेशन्स
नव्या रियलमी लॅपटॉपमध्ये 14 इंचाचा मोठा 2K डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन 2160×1440 आणि अस्पेक्ट रेशियो 3:2 आहे. हा डिस्प्ले 400 निट्स ब्राईटनेसला सपोर्ट करतो. कंपनीनं यात प्रोसेसिंगसाठी i5-11320H 11th Gen प्रोसेसरचा वापर केला आहे. सोबत Intel Iris Xe Graphics G7 96EU जीपीयू देण्यात आला आहे.
हा लॅपटॉप 16जीबी रॅम आणि 512जीबी SSD स्टोरेजसह विकत घेता येईल. तसेच यात Microsoft Window 11 ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. तसेच मायक्रोसॉफ्ट ऑफिस होम अँड स्टूडेंट एडिशन प्री-इंस्टॉल मिळते. यातील 54Whr बॅटरी सिंगल चार्जमध्ये 11 तासांचा बॅकअप देते. तसेच यात 65W सुपरफास्ट चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे.
रियलमी बुक एनहांस्ड एडिशन एयरचा वजन फक्त 1.37 किलोग्राम आहे, जो जुन्या 1.47 किलोग्राम वजनाच्या लॅपटॉपपेक्षा कमी आहे. या लॅपटॉप ग्लासच्या ऐवजी स्क्रीन फ्रेमवर पॉलिएस्टर पॉलीमरचा वापर केला आहे, त्यामुळे वजन कमी झाल्याचं कंपनीनं सांगितलं आहे.
हे देखील वाचा:
आतापर्यंतचा मोठा डिस्काउंट! iPhone 12 Mini वर फ्लिपकार्ट देतंय तगडी सूट; अशी आहे ऑफर