Realme ने TechLife इव्हेंटमध्ये अनेक प्रोडक्ट्स सादर केले आहेत. कंपनीने Realme Buds 2 Neo, Realme Beard Trimmer, Beard Trimmer Plus आणि Realme Hair Dryer भारतात लाँच केले आहेत. त्याचबरोबर रियलमीने DIZO ब्रँडअंतर्गत GoPods D इयरबड्स आणि Wireless Bluetooth Headset देखील लाँच केले आहेत.
Realme Buds 2 Neo
Realme Buds 2 Neo कंपनीच्या Realme Buds चा अपग्रेडेड व्हर्जन आहे. यांची किंमत 499 रुपये ठेवण्यात आली आहे. हे वायर्ड इयरफोन्स आजपासूनच Flipkart आणि Realme ई-स्टोरवर विक्रीसाठी उपलब्ध होतील. या इयरफोन्समध्ये 11.2 mm चा ड्रायव्हर देण्यात आला आहे. यातील गियर शेप्ड केबल डिजाइन याची वायर गुंतू देत नाही. या इयरफोन्समध्ये रिड्यूस नॉइज फीचर आणि कंट्रोल बटन्स देण्यात आले आहेत.
Realme Beard Trimmer आणि Trimmer Plus
रियलमीने Beard Trimmer आणि Beard Trimmer Plus असे दोन ट्रीमर भारतात लाँच केले आहेत. यात 10mm आणि 20mm ची कॉम्ब मिळतात. स्कीन फ्रेंडली ABS मटेरियलने हे ट्रीमर बनवण्यात आले आहेत, असे कंपनीने सांगितले आहे. Beard Trimmer मध्ये 20 लेंथ सेटिंग्स आणि USB Type C चार्जिंगसह 800mAh ची बॅटरी मिळते. रियलमीचा हा ट्रीमर 1,299 रुपयांमध्ये विकत घेता येईल. Beard Trimmer Plus मध्ये 40 लेंथ सेटिंग्स मिळतात. हा IPX7 वाटर रेजिस्टन्सला सपोर्ट करतो. या ट्रीमरची किंमत 1,499 रुपये आहे. हे दोन्ही प्रोडक्ट्स 5 जुलैपासून खरेदीसाठी उपलब्ध होतील.
Realme Hair Dryer
Realme Hair Dryer ची किंमत 1,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या हेयर ड्रायरच्या फॅनमध्ये 19,000rpm पावर मिळते. यातील 1,400W ची क्वाईल 55 डिग्रीपर्यंत गरम होते. त्यामुळे फक्त 5 मिनिटांत केस सुकतात. या हेयर ड्रायरमध्ये दोन विंड स्पीड मोड, एक हीट सेटिंग आणि एक कोल्ड एयर सेटिंगमिळते.