जुलैमध्ये व्हिएतनाममध्ये सादर झालेला बजेट Realme C21Y स्मार्टफोन आज भारतात लाँच करण्यात आला आहे. C सीरीजमध्ये आलेला हा नवीन एंट्री-लेवल स्मार्टफोन 30 ऑगस्टपासून विकत घेता येईल. दोन व्हेरिएंटमध्ये सादर झालेल्या या स्मार्टफोनची प्रारंभिक किंमत 8,999 रुपये ठेवण्यात आली आहे. चला जाणून घेऊया स्वस्त Realme C21Y स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत.
Realme C21Y चे स्पेसिफिकेशन्स
Realme C21Y मध्ये 6.5 इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 1600 × 720 पिक्सल आहे आणि हा डिस्प्ले 400निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो. या रियलमी स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड 10 वर आधारित रियलमी युआय देण्यात आला आहे. हा फोन Unisoc T610 चिपसेट आणि माली जी52 जीपीयूला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: Narzo 40 सीरिज कुठे गेली? थेट Realme Narzo 50A 4G भारतीय वेबसाईटवर लिस्ट
फोटोग्राफीसाठी Realme C21Y मधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा ब्लॅक अँड व्हाईट सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. सिक्योरिटीसाठी या फोनच्या मागे फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअपसाठी Realme C21Y मध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. हे देखील वाचा: Alert! हे 8 अॅप्स चुकूनही करू नका डाउनलोड; आणखीन 120 अॅप्स अजूनही अँड्रॉइडवर उपलब्ध
Realme C21Y ची किंमत
रियलमी सी21वाय च्या 3GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज मॉडेलची किंमत 8,999 रुपये आहे. तर 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज असलेला व्हेरिएंट 9,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा फोन 30 ऑगस्टपासून फ्लिपकार्ट आणि रियलमी इंडियावर खरेदीसाठी Blue आणि Black रंगात उपलब्ध होईल.