Realme लवकरच आपला पहिला Android Go स्मार्टफोन Realme C21Y नावाने लाँच करू शकते. या स्मार्टफोनची किंमत 5,000 रुपयांच्या आसपास असू शकते, अशी चर्चा आहे. काही रिपोर्ट्सनुसार रियलमी सी21वाय भारतीय बाजारात JioPhone Next ला आव्हान देऊ शकतो. आज रियलमी सी21वाय बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर लिस्ट करण्यात आला आहे. तिथे या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे.
Realme C21Y चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर स्पेसिफिकेशन्ससह लिस्ट करण्यात आला आहे. 26 जूनची ही लिस्टिंग नॅशविले वेबसाइटच्या माध्यमातून समोर आली आहे. लिस्टिंगनुसार रियलमी सी21वायला सिंगल-कोर मध्ये 349 आणि मल्टी-कोरमध्ये 1263 स्कोर मिळाला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 ओएससह येईल आणि यात आक्टाकोर प्रोसेसर तसेच 4 जीबी रॅम असेल.
Realme C21Y चे स्पेसिफिकेशन्स
रियलमी सी21वाय स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स अनेक लिक्सच्या माध्यमातून समजले आहेत. या फोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात येईल. हा फोन 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल. रियलमीचा हा फोन अँड्रॉइड 11 ओएसच्या ‘गो’ ओएससह लाँच करण्यात येईल. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये Unisoc T610 चिपसेट मिळू शकतो.
रियलमी सी21वायमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलचा सेकंडरी आणि 2 मेगापिक्सलचा तिसरा सेन्सर मिळू शकतो. या फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट असल्याची माहिती लीक झाली आहे. सिक्योरिटीसाठी Realme C21Y मध्ये रियर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात येईल. तसेच या फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी असल्याची माहिती देखील समोर आली आहे.