Realme ने ‘सी’ सिरीजमध्ये Realme C20, Realme C21 आणि Realme C25 हे फोन्स लाँच केल्यानंतर आता भारतात Realme C25sस्मार्टफोन लाँच केला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी मलेशियात लाँच झालेला हा फोन भारतात मात्र कंपनीने कोणताही गाजावाजा न करता लाँच केला आहे. हा स्मार्टफोनरियलमी सी25 चा अपग्रेडेड व्हेरिएंट आहे.
Realme C25s ची किंमत
Realme C25s दोन व्हेरिएंटमध्ये सादर केला गेला आहे. या फोनचा 4 जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज भारतात 9,999 रुपयांमध्ये सादर केला गेला आहे. तर, 4जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत कंपनीने 10,999 रुपये ठेवली आहे. फोन 9 जूनपासून फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या वेबसाईटवर खरेदीसाठी उपलब्ध होईल.
Realme C25s ची डिजाईन
Realme C25s वॉटरड्रॉप नॉच डिजाइनसह सादर केला गेला आहे. तसेच, फोनच्या मागे Geometric Art Design दिली आहे. मागील पॅनलवर वरच्या बाजूला डावीकडे चौरसाकृती कॅमेरा सेटअप आणि फिंगरप्रिंट सेन्सर आहे. उजव्या पॅनलवर वॉल्यूम रॉकर व पावर बटण तर डाव्या पॅनलवर सिम स्लॉट आहे. फोनच्या खालच्या पॅनलवर 3.5एमएम जॅकसह यूएसबी टाइप सी पोर्ट आणि स्पीकर ग्रिल आहे.
Realme C25s चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स
रियलमी सी25एस मध्ये 6.5 इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले आहे. फोनमध्ये मीडियाटेक हीलियो G85 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच, फोन 4 जीबी रॅमसह 64जीबी स्टोरेज आणि 4जीबी रॅम 128 जीबी स्टोरेजसह लाँच झाला आहे.
रियलमी सी25एस मध्ये फोटोग्राफीसाठी मागील बाजूस क्वाड-कॅमेरा देण्यात आला आहे. यात 48 मेगापिक्सल प्राइमरी, 2 मेगापिक्सल मॅक्रो आणि 2 मेगापिक्सलचा ब्लॅक-अँड-वाइट कॅमेरा आहे. फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनला पावर देण्यासाठी 6,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. स्मार्टफोन अँड्रॉइड 11 आधारित रियलमी UI 2.0 स्किनसह येतो.