Realme ने आपल्या ‘सी’ सीरिजमध्ये नवीन स्वस्त स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीने फक्त 10,999 रुपयांमध्ये Realme C25Y स्मार्टफोन सादर केला आहे. हा फोन 50MP रियर कॅमेरा, 5000mAh आणि 4GB रॅमला सपोर्ट करतो. रियलमी सी25वाय चे दोन व्हेरिएंट 27 सप्टेंबरपासून शॉपिंग साइट फ्लिपकार्टवरून विकत घेता येतील.
Realme C25Y ची किंमत
Realme C25Y दोन व्हेरिएंटमध्ये भारतात दाखल झाला आहे. यातील 4GB RAM आणि 64GB स्टोरेज असलेला छोटा मॉडेल 10,999 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. तर मोठ्या 4GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 11,999 रुपये द्यावे लागतील. Glacier Blue आणि Metal Grey रंगात उपलब्ध होणारा हा फोन 27 सप्टेंबरपासून विकत घेता येईल.
Realme C25Y चे स्पेसिफिकेशन्स
Realme C25Y स्मार्टफोनमध्ये 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.5-इंचाचा एलसीडी डिस्प्ले मिळतो. प्रोसेसिंगसाठी कंपनीने Unisoc T610 चिपसेटचा वापर केला आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन माली जी52 जीपीयूला सपोर्ट करतो. हा बजेट फोन अँड्रॉइड 11 ओएससह लाँच करण्यात आला आहे. यात 4GB RAM आणि 128GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. वहीं .
फोटोग्राफीसाठी या बजेट फोनमध्ये कंपनीने ट्रिपल रियर कॅमेरा दिला आहे. या एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा ब्लॅक अँड व्हाईट सेन्सर मिळतो. या फोनच्या फ्रंटला 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. बेसिक कनेक्टिव्हिटीसह येणाऱ्या Realme C25Y स्मार्टफोनमध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे.