Realme C31 आज भारतात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. या फोननं देशात 5000mAh बॅटरी, 13MP कॅमेरा, 4GB रॅम, Unisoc प्रोसेसर आणि साईड फिंगरप्रिंट सेन्सरसह पदार्पण केलं आहे. तुम्ही हा मोबाईल आज दुपारी 12 वाजल्यापासून रियलमीच्या ऑनलाइन स्टोर, फ्लिपकार्ट आणि ऑफलाइन रिटेल स्टोर्समधून विकत घेऊ शकता.
Realme C31 ची किंमत
Realme C31 स्मार्टफोनचे दोन रॅम आणि स्टोरेज मॉडेल सादर करण्यात आले आहेत. या स्मार्टफोनचा 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज असलेला मॉडेल 8,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज मॉडेलची किंमत 9,999 रुपये आहे. या स्मार्टफोनचे डार्क ग्रीन आणि लाईट सिल्वर कलर व्हेरिएंट बाजारात उपलब्ध होतील.
एचडीएफसी आणि एसबीआय बँकेचा कार्ड धारकांना या फोनच्या मोठ्या व्हेरिएंटवर 500 रुपयांची तर छोट्या व्हेरिएंटवर 1,000 रुपयांची सूट मिळेल. तसेच कंपनीनं नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय दिला आहे. जिथे तुम्ही 24 महिने फक्त 433 रुपयांचा हप्ता देऊन हा फोन विकत घेऊ शकता.
Realme C31 चे स्पेसिफिकेशन्स
रियलमी सी31 मध्ये 6.5 इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित रियलमी युआय आर एडिशनवर चालतो. कंपनीनं यात ऑक्टकोर UniSoC T612 प्रोसेसरचा वापर केला आहे. सोबत 4GB पर्यंत रॅम आणि 64GB पर्यांतची इंटरनल स्टोरेज मिळते. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह यात साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
फोटोग्राफीसाठी रियलमी सी31 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलची ब्लॅक अँड व्हाईट लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. तसेच पावर बॅकअपसाठी रियलमी सी31 स्मार्टफोनमध्ये 10वॉट फास्ट चार्जिगसह 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.