Realme चा दमदार फ्लॅगशिप Realme GT 2 Pro लवकरच भारतीयांच्या भेटीला येणार आहे. परंतु म्हणून कंपनीनं बजेट सेगमेंटकडे दुर्लक्ष केलेलं नाही. कंपनीनं अधिकृतपणे सांगितलं आहे की Realme C31 स्मार्टफोन 31 मार्चला भारतात लाँच केला जाईल. हा फोन Realme C21 स्मार्टफोनची जागा घेईल. जागतिक बाजारात याआधीच लाँच झाल्यामुळे रियलमी सी31 चे स्पेसिफिकेशन्स उपलब्ध आहेत.
Realme C31 चे स्पेसिफिकेशन्स
रियलमी सी31 मध्ये 6.5 इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित रियलमी युआय आर एडिशनवर चालतो. कंपनीनं यात ऑक्टकोर UniSoC T612 प्रोसेसरचा वापर केला आहे. सोबत 4GB पर्यंत रॅम आणि 64GB पर्यांतची इंटरनल स्टोरेज मिळते. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह यात साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
फोटोग्राफीसाठी रियलमी सी31 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलची ब्लॅक अँड व्हाईट लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. तसेच पावर बॅकअपसाठी रियलमी सी31 स्मार्टफोनमध्ये 10वॉट फास्ट चार्जिगसह 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.
Realme C31 ची किंमत
Realme C31 स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी इंडोनेशियामध्ये सादर करण्यात आला आहे. तिथे या फोनचा 3GBरॅम व 32GB मेमरी असलेला मॉडेल IDR 15,99,000 (जवळपास 8,500 रुपये) आणि 4GB रॅम व 64GB मेमरी मॉडेल IDR 17,99,000 (जवळपास 9,500 रुपये) मध्ये विकला जात आहे. भारतीय किंमत देखील याच्या आसपास असू शकते.