Realme C35 स्मार्टफोन गेल्याच आठवड्यात भारतात सादर करण्यात आला आहे. आज या बजेट स्मार्टफोनचा पहिला सेल आहे. हा फोन 50MP Camera, 5,000mAh battery, 4GB RAM आणि Unisoc T616 चिपसेटसह देशात आला आहे. तसेच याची डिजाईनमध्ये iPhone ची झलक दिसते. पहिल्याच सेलमध्ये या फोनवर मोठा डिस्काउंटही मिळत आहे.
Realme C35 Price In India Flipkart
Realme C35 च्या 4GB RAM + 64GB मॉडेलची किंमत 11,999 रुपये आहे. तर 4GB RAM + 128GB स्टोरेज मॉडेलसाठी 12,999 रुपये मोजावे लागतील. हा बजेट फोन आज अर्थात 12 मार्च दुपारी 12 वाजलपासून विकत घेता येईल. या फोनचे ग्लोइंग ब्लॅक आणि ग्लोइंग ग्रीन कलर व्हेरिएंट Realme.com आणि Flpkart वरून विकत घेता येतील.
Realme C35 ची खरेदी करताना Paytm चा वापर केल्यास तुम्हाला 1,000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळेल. तसेच SBI कार्डवर देखील 10 टक्क्यांपर्यंतची कॅशबॅक ऑफर मिळत आहे. हा फोन फक्त 416 रुपयांच्या मासिक हप्त्यावर देखील विकत घेता येईल.
Realme C35 चे स्पेसिफिकेशन्स
रियलमी सी35 स्मार्टफोनमधील 6.6 इंचाचा फुलएचडी+ वॉटर ड्रॉप डिस्प्ले 2408 x 1080 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. यात 600निट्स ब्राईटनेस आणि 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी या रियलमी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, एक मॅक्रो लेन्स आणि एक ब्लॅक अँड व्हाईट लेन्स देण्यात आली आहे. फोनमधील फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सलचा आहे.
हा फोन अँड्रॉइड 11 बेस्ड रियलमी युआयच्या आर एडिशनवर चालतो. याला Unisoc T616 चिपसेटची प्रोसेसिंग पावर आणि एआरएम माली जी57 जीपीयू देण्यात आला आहे. सोबत 4GB RAM आणि 128GB पर्यंतची स्टोरेज मिळते.बेसिक कनेक्टिव्हिटीसह यात सिक्योरिटीसाठी साईड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फिचर मिळतं. तर पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचची बॅटरी 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह देण्यात आली आहे.
हे देखील वाचा: