तुम्हाला फोटोग्राफीची आवड असल्यास, तुम्हाला 7.5 लाखांपर्यंतचे रोख बक्षीस जिंकण्याची संधी आहे. टेक कंपनीने Realme ग्राहकांसाठी ग्लोबल फोटोग्राफी कॉन्टेस्ट 2022 ही स्पर्धा आणली आहे. ही स्पर्धा 31 मार्चपासून सुरू झाली असून 18 जून 2022 पर्यंत चालणार आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या ग्राहकांना Realme GT 2 Pro, Realme Buds Air 3 व्यतिरिक्त 10 हजार डॉलर्सपर्यंतचे (सुमारे 7.59 लाख रुपये) रोख बक्षिस जिंकण्याची संधी मिळणार आहे.
या स्पर्धेत युझर्स स्ट्रीट, पोर्ट्रेट, लँडस्केप आणि क्रिएटिव्ह या चार थीममध्ये भाग घेऊ शकतात. तसंच या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या युझर्सना https://c.realme.com/global/gallery/shot-on-realme2022 ला भेट देऊन जगाला आपल्या फोटोग्राफीचं आणि स्टोरी टेलिंगचं कौशल्य दाखवता येईल.
ई सर्टिफिकेट आणि फोटोग्राफी वर्कशॉप स्पर्धेतील विजेत्या युजर्सना सहभागी झाल्याबद्दल कंपनीकडून ई-सर्टिफिकेट मिळेल आणि त्यांचं काम कंपनी त्यांच्या सोशल मीडिया चॅनेल आणि ऑफिशिअल इव्हेंट्समध्ये प्रदर्शित करेल. इतकंच नाही तर विजेत्यांना कंपनी आपल्या असोसिएट्स फोटोग्राफर म्हणून त्यांची नियुक्ती करेल आणि यावर्षी फोटोग्राफी कार्यशाळा घेण्याची संधीही मिळेल.
पहिला येणाऱ्यला ५ हजार डॉलर्सबक्षिसं आणि पुरस्कारांबद्दल सांगायचं झालं तर या स्पर्धेत एकूण 15 विजेते निवडले जातील. जुरींचे एक पॅनेल विजेता कोण असेल हे ठरवेल. यामध्ये तीन ग्रँड प्राईजेस, चार थीम अवॉर्ड आणि आठ एक्सलेंस अवॉर्ड्सचा समावेश आहे. ग्रँड प्राइज जिंकणाऱ्या पहिल्या विजेत्याला 5 हजार डॉलर्स, दुसऱ्याला 3 हजार डॉलर्स आणि तिसऱ्याला 2 हजार डॉलर्स मिळतील. याशिवाय कंपनी या तीन विजेत्यांना Reality GT 2 Pro हँडसेट देखील देईल. थीम अवॉर्डच्या चार विजेत्यांना Realme GT 2 Pro फोन आणि Realme Buds 3 मिळतील. त्याच वेळी एक्सलेंस अवॉर्ड विजेत्यांना रिअलमी जीटी 2 प्रो दिला जाईल. स्पर्धेतील विजेत्यांची नावे 5 जुलै रोजी जाहीर केली जातील.